Advertisement

दिलासादायक: वरळी कोळीवाड्यातील 'इतके' टक्केभाग प्रतिबंधित क्षेत्राच्या यादीतून मुक्त

महापालिकेच्या शर्तीच्या प्रयत्नांनतर येथील कोरोनाचा धोका हळूहळु टळू लागला.

दिलासादायक: वरळी कोळीवाड्यातील 'इतके' टक्केभाग प्रतिबंधित क्षेत्राच्या यादीतून मुक्त
SHARES

मुंबईतील जी दक्षिण विभागातील वरळी परिसर कोरोना व्हायरसचा हॉटस्पॉट ठरला होता. परंतु, महापालिकेच्या शर्तीच्या प्रयत्नांनतर येथील कोरोनाचा धोका हळूहळु टळू लागला. कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागल्यानं प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आलेल्या वरळी कोळीवाड्यातील रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळविण्यात महापालिका यशस्वी झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वरळी कोळीवाड्यातील ७५ टक्केभाग प्रतिबंधित क्षेत्रांच्या यादीतून मुक्त करण्यात आला आहे. मात्र रहिवाशांनी एकमेकांपासून सुरक्षित अंतर पाळण्याच्या नियमांचं काटेकोरपणं पालन करण्याचं आवाहन महापालिकेनं केलं आहे.

हेही वाचा - वरळीत करोनामुक्त रुग्णांच्या संख्येत वाढ

महापालिकेच्या जी-दक्षिण विभागानं २९ मार्च रोजी वरळी कोळीवाडा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केला होता. वरळी कोळीवाड्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागल्यामुळं धोका वाढत होता. कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून नागरिकांवर निर्बंध घालण्यात आले. त्याचे परिणाम आता दिसू लागले असून, कोळीवाडयातील ७५ टक्के भागात कोरोनाचा एकही रुग्ण आढळलेला नाही. त्यामुळं प्रशासनानं कोळीवाड्यातील हा ७५ टक्के भाग प्रतिबंधित क्षेत्रातून मुक्त केला आहे. 

हेही वाचा - 'वन रुपी क्लिनिक'मुळे वरळीत सापडले ५२ कोरोना पॉझिटिव्ह संशयित

प्रतिबंधित क्षेत्राच्या यादीतून मुक्त केलेल्या भागात आवश्यक ती दुकाने आणि भाजीपाला विक्रीलाही परवानगी देण्यात आली आहे. कोरोनाच्या संसर्गाचा प्रसार होवू नये यासाठी सामाजिक अंतराचे नियम पाळणं बंधनकारक आहे. या संदर्भात वरळी कोळीवाड्यातील नेते मंडळी, पोलीस आणि पालिका अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. टाळेबंदी आणि सामाजिक अंतराबाबतचे नियम पाळण्याबाबत जनजागृती करण्याची जबाबदारी वरळी कोळीवाड्यातील नेते मंडळींवर सोपविण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यात मागील पाच दिवसात कोरोनाने ५०२ जणांचा बळी घेतला आहे. आज राज्यात कोरोनाचे ८९ जणांचा बळी गेल्याची नोंद करण्यात आली आहे. तर मुंबईत दिवसभरात १२४४ नवीन रुग्ण आढळल्यानं कोरोनाशी २ हात करणाऱ्या अत्यावश्यक सेवांवरील भार दिवसेंदिवस वाढतच आहे. मुंबईत रविवारी दिवसभरात ५२ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात कोरोनाबाधीत रुग्णांमध्ये मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे.



हेही वाचा -

सोमवारपासून लांब पल्ल्याच्या २०० रेल्वे फेऱ्यांना सुरुवात

Lockdown 5.0: महाराष्ट्र सरकारची नियमावली जाहीर, तुम्हाला वाचायलाच हवी...



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा