Advertisement

वरळीत करोनामुक्त रुग्णांच्या संख्येत वाढ


वरळीत करोनामुक्त रुग्णांच्या संख्येत वाढ
SHARES

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळं राज्यभरात रुग्णांची संख्या मोठअया प्रमाणात वाढ आहे. एकीकडं मुंबई कोरोनाचं हॉस्पॉट झालं आहे. मात्र दुसरीकडं मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे महिन्याभरापासून सर्वाधिक रुग्णसंख्या भाग असलेल्या वरळीत कोरोनामुक्त रुग्णांची टक्केवारी वाढली आहे. या भागातील कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या आता अधिक आहे.

मंगळवापर्यंत ७५४ रुग्ण करोनामुक्त झाले, तर ५२६ रुग्ण बाधित आहेत. मुंबईतील कोरोनामुक्तीचा दर २६ टक्के असताना वरळीत मात्र कोरोनामुक्तीचं प्रमाण ५५ टक्के इतकं आहे. मुंबईतील कोरोनाचे अतिसंक्रमित क्षेत्र ठरलेल्या वरळी आणि प्रभादेवीचा समावेश असलेल्या जी दक्षिण विभागात सर्वाधिक रुग्ण सापडत होते. 

गेले काही दिवस या भागात रुग्ण सापडण्याचं प्रमाण कमी झालं असून कोरोनामुक्त होऊन घरी जाणाऱ्यांचं प्रमाण वाढलं आहे. करोनाने मुंबईत शिरकाव केला तेव्हा सुरुवातीला मुंबईतील एकूण रुग्णांपैकी २० टक्के रुग्ण हे वरळी व प्रभादेवीतील होते. वरळी कोळीवाडा, जिजामाता नगर, बीडीडी चाळी, सातरस्ता, पोलिस कॅम्प या भागातून मोठय़ा प्रमाणावर रुग्ण बाधित झाले होते.



हेही वाचा -

Coronavirus Updates: ३ लाखाहून अधिक धारावीकरांची तपासणी

निवासी डॉक्टरांना आठवड्यातील ५ दिवस काम आणि २ दिवस सुट्टी



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा