Advertisement

'वन रुपी क्लिनिक'मुळे वरळीत सापडले ५२ कोरोना पॉझिटिव्ह संशयित

वन रुपया क्लिनिक टीमनं वरळी इथल्या बीडीडी चाळीत १ हजार ३६० खोल्यांमध्ये स्क्रिनिंग केलं.

'वन रुपी क्लिनिक'मुळे वरळीत सापडले ५२ कोरोना पॉझिटिव्ह संशयित
SHARES

शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी नुकतीच ट्विटरवर घोषणा केली कीवन वन रुपया क्लिनिक टीमनं वरळी इथल्या बीडीडी चाळीत १ हजार ३६० खोल्यांमध्ये ताप तपासणी (स्क्रिनिंग) केली. यामुळे कोरोनाचे ५२ संशयित रुग्ण ओळखण्यास मदत झाली आहे.

https://twitter.com/AUThackeray/status/1261239308641394688

आदित्य ठाकरे यांनी १ रुपयात आरोग्य तपासणी करता यावी यासाठी राज्यभर ‘१ रुपी क्लिनिक’ सुरू केली होती. त्याअंतर्गत २०० वेगवेगळ्या प्रकारच्या रोगांचे परीक्षण केलं जाईल. यामुळे समाजात दारिद्र्य रेषेखाली राहणाऱ्या लोकांना आजारावर उपचार करण्यास मदत होईल.

दरम्यान महाराष्ट्रातील विस्तारित लॉकडाऊन विषयी बोलताना मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलं की, ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी लॉकडाऊन सुलभ केलं गेलं आहे. आर्थिक कामं सुरू केली आहेत. इतर देशांपेक्षा आपल्या देशात लॉकडाउन यशस्वी ठरला आहे. याव्यतिरिक्त, त्यांनी चेतावणी दिली की, पुढचे ५-६ महिने आपल्याला या व्हायरसचा सामना करम्यासाठी तयार राहायचं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यापूर्वी ही घोषणा केली होती की, २० एप्रिलपासून ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये राज्य सरकार अंशतः लॉकडाऊनचे नियम शिथिल करेल. तथापि, कोविडच्या घटनांमध्ये वाढ झाल्यानं सरकारला पुणे आणि मुंबईतील अंशत: लॉकडाऊनच्या निर्णयाला स्थगिती द्यावी लागली. सध्या महाराष्ट्रात कोरोनाव्हायरसचे २७ हजार ५५४ रुग्ण आहेत. त्यापैकी १६ हजार ७८६ रुग्ण मुंबईतील आहेत.




Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा