Advertisement

मध्य रेल्वेवर तिकिटांचा परतावा देण्यास सुरूवात


मध्य रेल्वेवर तिकिटांचा परतावा देण्यास सुरूवात
SHARES

रेल्वे प्रशासनानं राज्याच्या विविध भागांत अडकलेल्या परप्रांतीय मजूरांना त्यांच्या राज्यात पाठविण्यासाठी विशेष ट्रेन सुरू केली. त्यानंतर अनेक गाड्या सुरू करत प्रवाशांना आरक्षण करण्यास सांगण्यात आलं होतं. परंतु, काही कारणात्सव लॉकडाऊनच्या कालावधीत २२ मार्च ते ३० जून यादरम्यान मेल-एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळं रद्द झालेल्या रेल्वेगाड्यांच्या तिकिटांचा परतावा मध्य रेल्वेवर मंगळवारपासून मिळत आहे. तसंच, पश्चिम रेल्वेवर बुधवारपासून म्हणजे २७ मेपासून हा परतावा देण्यात येणार आहे. 

तिकीट परताव्यासाठी काही निवडक स्थानकांवर मर्यादित स्वरूपात तिकीट खिडक्या सुरू केल्या गेल्या आहेत. ऑनलाइन तिकीट आरक्षित केलेल्या प्रवाशांच्या खात्यात थेट पैसे जमा करण्यात आले असले तरीही तिकीट खिडकीवरून काढलेल्या प्रवाशांना त्यांच्या तिकिटांचा परतावा मिळवण्याची चिंता होती. त्यानुसार तिकीट खिडक्यांवर ही सुविधा देण्याचा निर्णय घेण्यात आला.

मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे चार, लोकमान्य टिळक टर्मिनसवर तीन, दादर, ठाणे, कल्याण, पनवेल स्थानकात प्रत्येकी २ खिडक्या आणि बदलापूर स्थानकात १ तिकीट खिडकी सुरू करण्यात आली आहे. तिकीटाचा परतावा घेताना नागरिकांना स्थानकात सामाजिक अंतराचं पालनही करावं लागणार आहे. 

पश्चिम रेल्वेवर चर्चगेट, मुंबई सेंट्रल, वसई रोड, वलसाड, सुरत आणि नंदुरबार स्थानकांत प्रत्येकी २ तिकीट खिडक्या सुरू करण्यात आल्या आहेत, तर २७ मेपासून अंधेरी, बोरिवली आणि वापी येथेही तिकीट खिडकी सुरू करण्यात येणार आहे.

असा मिळणार तिकिटाचा परतावा 

  • २२ ते ३१ मार्च- २७ मेपासून
  • १ ते १४ एप्रिल- ३ जूनच्या पुढे
  • १५ ते ३० एप्रिल- ७ जूनच्या पुढे
  • १ ते १५ मे- १४ जूनच्या पुढे
  • १६ ते ३१ मे- २१ जूनच्या पुढे
  • १ ते ३० जून- २८ जूनपासून



हेही वाचा -

जोडप्यानं मुलाचं नाव ठेवलं 'लॉकडाऊन'

विमान सेवेतून 'इतक्या' प्रवाशांचं मुंबईत आगमन



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा