Advertisement

जोडप्यानं मुलाचं नाव ठेवलं 'लॉकडाऊन'

अनेक जोडपी आपल्या नवजात बाळांची नावं या महामारीवरून ठेवत आहेत. एका जोडप्यानं आपल्या मुलाचं नाव लॉकडाऊन ठेवलं आहे...

जोडप्यानं मुलाचं नाव ठेवलं 'लॉकडाऊन'
SHARES

जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र दुसरीकडे अनेक जोडपी आपली नवजात बाळांची नावं या महामारीवरून ठेवत आहेत. नुकतंच उत्तर प्रदेशमधील एका जोडप्यानं आपल्या जुळ्या बाळांची नावे ‘सॅनिटायझर’ आणि ‘क्वारंटाईन’ ठेवल्याचे समोर आले होते. आता आणखी एका महिलेनं आपल्या मुलाचं नाव चक्क ‘लॉकडाऊन यादव’ ठेवलं आहे.

मूळच्या उत्तर प्रदेशच्या असलेल्या रीता यादव या मुंबईवरून श्रमिक एक्स्प्रेसमधून आपल्या घरच्या दिशेनं निघाल्या होत्या. मात्र त्यांना अचानक प्रसुती कळा सुरू झाल्यानं त्यांना मध्य प्रदेशच्या बुरहानपूर इथल्या जिल्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. इथं त्यांनी मुलाला जन्म दिला. या मुलाचं नाव त्यांनी ‘लॉकडाऊन’ यादव ठेवलं आहे.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री पृथ्वीराज सिंग चौहान यांनी याबाबत ट्विटरवर माहिती दिली. हे बाळ मध्य प्रदेशचे असल्याचं चौहान म्हणाले. चौहान यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये महिलेला घरी पाठवण्यासाठी प्रशासनाचे आभार मानत आहे.




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा