रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मुबादला इन्व्हेस्टमेंटची ६,२४७.५ कोटींची गुतवणूक

अबुधाबीची मुबादला इन्व्हेस्टमेंटनं ( Mubadala Investment Co ) रिलायन्स इंडस्ट्रीज (RIL) मध्ये मोठी गुंतवणूक करण्याचं घोषित केलं आहे. ६ हजार २४७.५ कोटींची गुंतवणूक करून त्या बदल्यात १.४ टक्के RIL चे शेअर मुबादलाकडे जातील.

रिलायन्स इंडस्ट्रीज् कडून मिळालेल्या माहितीनुसार, सिल्व्हर लेक इंडस्ट्रीज आणखी १ हजार ८७५ कोटींची गुंतवणूक रिलायन्समध्ये करणार आहे. सिल्व्हर लेक इन्व्हेस्टमेंट भारतातील सर्वात मोठी ब्रिक्स आणि मोटार इंडस्ट्री आहे. रिलायन्स रिटेल ऑपरेटर्स भारताची सर्वात मोठी आणि वेगानं विस्तार होणारी कंपनी आहे.

रिलायन्स समूहानं (RIL) बुधवारी अशी माहिती दिली आहे की, प्रायव्हेट इक्विटी फर्म सिल्व्हर लेक (Silver Lake Partners)चे सह-गुंतवणूकदार रिलायन्स रिटेलमध्ये १ हजार ८७५ कोटींची अतिरिक्त गुंतवणूक करणार आहेत. यानंतर RRVL मध्ये सिल्व्हर लेक आणि त्यांच्या सह-गुंतवणूकदारांची गुंतवणूक एकूण ९ हजार ३७५ कोटींवर पोहोचली आहे.

आता सिल्व्हर लेकची रिलायन्स रिटेलमधील एकूण भागीदारी २.१३ टक्के झाली आहे. ३० सप्टेंबर रोजी करण्यात आलेली ही दुसरी आणि गेल्या ३ आठवड्यातील चौथी गुंतवणूक आहे. रिलायन्स स्टॉक एक्सचेंज फायलिंग (Stock Exchange Filing) मध्ये दिलेल्या माहितीनुसार, या गुंतवणुकीनंतर रिलायन्स रिटेल प्री-इक्विटी मूल्य ४.२८५ लाख कोटी आहे.

जून महिन्यात मुबादला इंडस्ट्रीजने जीओमध्ये ९ हजार ०९३ कोटींची गुंतवणूक केली. जीओमधील गुंतवणूकदार आता रिलायन्समध्येही गुंतवणूक करण्यात उत्सुक आहेत. मुबादला इंवेस्टमेंट कंपनी अबुदाबी इन्वेस्टमेंट अथॉरिटीनंतर दुसरी मोठी गुंतवणूकदार ठरली आहे.


हेही वाचा

रिलायन्स रिटेलमध्ये जनरल अटलांटिकची ३६७५ कोटींची गुंतवणूक

लॉकडाऊनमध्ये सायकलची विक्री सुसाट, मागणी वाढली

पुढील बातमी
इतर बातम्या