Advertisement

रिलायन्स रिटेलमध्ये जनरल अटलांटिकची ३६७५ कोटींची गुंतवणूक

गेल्या काही दिवसांपासून रिलायन्स रिटेलमध्ये मोठ्या प्रमाणावर विदेशी गुंतवणूकदार गुंतवणूक करत आहेत. त्यामुळे रिलायन्स रिटेलचे भाग भांडवल ४.२८ लाख कोटी रुपये झाले आहे.

रिलायन्स रिटेलमध्ये जनरल अटलांटिकची ३६७५ कोटींची गुंतवणूक
SHARES

जनरल अटलांटिक ही अमेरिकेतील खासगी इक्विटी फर्म रिलायन्स रिटेलमध्ये ३६७५ कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. रिलायन्स रिटेलमधील ०.८४ टक्के हिस्सेदारी जनरल अटलांटिक खरेदी करणार आहे. गेल्या महिनाभरातील रिलायन्स समूहातील रिलायन्स रिटेलमध्ये ही तिसरी महत्त्वाची आणि मोठी गुंतवणूक आहे. या महिन्याच्या सुरुवातीला सिल्वर लेकने रिलायन्स रिटेलमधील १.७५ टक्के हिस्सेदारी ७,५०० कोटी रुपयांनी खरेदी केली.

गेल्या काही दिवसांपासून रिलायन्स रिटेलमध्ये मोठ्या प्रमाणावर विदेशी गुंतवणूकदार गुंतवणूक करत आहेत. त्यामुळे रिलायन्स रिटेलचे भाग भांडवल ४.२८ लाख कोटी रुपये झाले आहे. या गुंतवणुकीबाबत रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी म्हणाले की, अमेरिकेच्या जनरल अटलांटिकसोबत आमचे संबंध चांगले आहेत. यामुळे ते आणखी विस्तारले याचा मला आनंद आहे. यामुळे भारतातील कंपनीच्या विस्ताराला आणि ग्राहकांना जास्तीत जास्त सुविधा देण्यास मदत होणार आहे. तर मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स रिटेलमध्ये गुंतवणूक करणे एक चांगली संधी आहे. त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला, असं जनरल अटलांटिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी बिल फोर्ड यांनी म्हटलं आहे.

रिलायन्स रिटेलमध्ये आतापर्यंत २३ हजार ५० कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. सिल्वर लेक, केकेआर आणि त्यांच्यानंतर जनरल अटलांटिक यांनी केलेले ही रिलायन्स रिटेलमधील तिसरी मोठी गुंतवणूक आहे.हेही वाचा -

रिलायन्स रिटेलमध्ये सिल्वर लेक करणार ७५०० कोटींची गुंतवणूक

कार्लाइल ग्रुप रिलायन्स रिटेलमध्ये करणार १५ हजार कोटींची गुंतवणूकRead this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement