सलग आठव्या दिवशी पेट्रोल, डिझेल महागले

मंगळवारी सलग आठव्या दिवशी देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत. पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल ३० पैसे तर डिझेल ३५ पैशांनी महाग केलं आहे. त्यामुळे मुंबईत पेट्रोलचा भाव ९५.७५ रुपये तर डिझेलचा दर ८६.७२ रुपये झाला आहे. 

सलग आठ दिवस झालेल्या दरवाढीने पेट्रोल आणि डिझेलच्या भावात दोन रुपयांची वाढ झाली आहे. परभणीमध्ये पॉवर पेट्रोलचा भाव १०० रुपयांवर गेला आहे. दिल्लीत पेट्रोल ८९.२९ रुपये तर डिझेल ७९.७० रुपयांना मिळत आहे. चेन्नईत  पेट्रोलचा भाव ९१.४५ रुपये आणि डिझेलचा दर ८४.७७ रुपये आहे. कोलकात्यात  पेट्रोल ९०.५४ रुपये झाले आहे. डिझेलचा भाव ८३.२९ रुपये झाला आहे.बंगळुरात पेट्रोल ९१.२८ रुपये आणि डिझेल ८४.४९ रुपयांना मिळत आहे. 

जागतिक पातळीवर क्रूड ऑईलमध्ये वाढ होत असल्याने देशात पेट्रोलियम कंपन्या पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ करत आहेत. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीने वर्षभराचा उच्चांकी स्तर गाठला आहे. मंगळवारी ब्रेंट क्रूडचा भाव ६३.३० डॉलर असून त्यात ०.८७ डॉलरची वाढ झाली. तर सिंगापूर क्रूड ऑइल एक्सचेंजमध्ये कच्च्या तेलाचा भाव ०.६९ डॉलरने वधारला आणि ६०.१६ डॉलर झाला.


हेही वाचा -

घरगुती गॅस सिलिंडर ५० रुपयांनी महागणार

महापालिका, बेस्ट कर्मचाऱ्यांना तिसरी संधी

लसीकरणासाठी २० खासगी रुग्णालयांना परवानगी


पुढील बातमी
इतर बातम्या