Advertisement

घरगुती गॅस सिलिंडर ५० रुपयांनी महागणार

देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर रोज वाढत आहेत. आता घरगुती गॅस सिलिंडरही महागला आहे. डिसेंबरनंतर घरगुती गॅस सिलिंडरचे भाव चौथ्यांदा वाढले आहेत. तर फेब्रुवारी महिन्यात दुसऱ्यांदा वाढ करण्यात आली आहे.

घरगुती गॅस सिलिंडर ५० रुपयांनी महागणार
SHARES

देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर रोज वाढत आहेत. आता घरगुती गॅस सिलिंडरही महागला आहे. मंगळवारी मध्यरात्रीपासून घरगुती गॅस सिलिंडर ५० रुपयांनी महागणार आहे. त्यामुळे मुंबईत आता गॅस ७६९ रुपयांना मिळणार आहे. 

डिसेंबरनंतर घरगुती गॅस सिलिंडरचे भाव चौथ्यांदा वाढले आहेत. तर फेब्रुवारी महिन्यात दुसऱ्यांदा वाढ करण्यात आली आहे. या अगोदर ४ फेब्रुवारीला विनाअनुदानित सिलेंडरच्या किंमतीत २५ रूपयांनी वाढ झाली होती. यावेळी सिलेंडरची किंमत ६९४ रूपयांवरून ७१९ रुपये झाली होती.

लाॅकडाऊनमध्ये देशभरात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचे दर स्थिर ठेवण्यात आले होते. सोमवारी पेट्रोल, डिझेल महागले आहे. पेट्रोलच्या दरात २८ पैशांनी वाढ झाली आहे. तर डिझेलच्या दरात ३४ पैशांनी वाढ झाली आहे.मुंबईत पेट्रोलचे दर ९५.१९ रुपयांवर तर डिझेलचे दर ८६.०२ रुपयांवर पोहेचले आहेत. 

देशातील इंधन दर जागतिक बाजाराशी संलग्न असल्याने पेट्रोलियम कंपन्यांकडून रोज इंधन दर निश्चित केले जातात. तर गॅस सिलिंडरच्या किमतीचा दर १५ दिवसांनंतर किंवा महिनाभराने आढावा घेतला जातो. 



हेही वाचा -

मुंबईतील नेहरूनगर, टिळकनगरमध्ये वेगाने कोरोना रुग्णवाढ

नागरिकांच्या सुरक्षेसाठी धारावीत पुन्हा चाचण्यांत वाढ



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा