Advertisement

मुंबईतील नेहरूनगर, टिळकनगरमध्ये वेगाने कोरोना रुग्णवाढ


मुंबईतील नेहरूनगर, टिळकनगरमध्ये वेगाने कोरोना रुग्णवाढ
SHARES

मुंबईत पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, पूर्व उपनगरात मागील काही दिवसांपासून रुग्णवाढ वेगाने होऊ लागली आहे. कुर्ला नेहरूनगर आणि टिळकनगर भागात रुग्णांची संख्या वाढत आहे. या परिसरात शनिवारी आणि रविवारी एकत्रित विशेष तपासणी मोहीम हाती घेण्यात आली.

मागील काही दिवसांपासून मुलुंड, कुर्ला आणि टिळकनगर परिसरातील रुग्णांची संख्या वाढत असल्याचे आढळून आले आहे. संपूर्ण मुंबईतील रुग्णवाढीचा सरासरी दर ०.१४ टक्के असताना चेंबूर, टिळकनगरचा भाग असलेल्या एम पश्चिम विभागात हाच दर ०.२८ टक्क्यांवर गेला आहे तर मुलुंडचा भाग असलेल्या टी विभागात ०.२२ टक्के आणि कु ल्र्याचा समावेश असलेल्या एल विभागात ०.१७ टक्के इतका झाला आहे.

कुर्ला विभागातील नेहरूनगर आणि त्याला लागूनच असलेल्या एम पश्चिम विभागातील टिळक नगर भागातच रुग्णवाढ होत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे दोन विभागातील पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एकत्रित तपासणी मोहीम हाती घेतली आहे. शनिवार आणि रविवार असे २ दिवस या भागातील प्रत्येक इमारतीत, वसाहतीत जाऊन लोकांची तपासणी करण्यात आली. शरीराचे तापमान आणि प्राणवायूची पातळी तपासण्यात आली.

संशयितांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या. पालिकेच्या सर्व दवाखान्यांव्यतिरिक्त १६ ठिकाणी करोनाच्या चाचण्या के ल्या जात आहेत, तसेच विभाग कार्यालयात येणाऱ्या प्रत्येकाच्या चाचण्या केल्या जात आहेत. तर नेहरूनगर टर्मिनसवरही परराज्यातून आलेल्यांच्या चाचण्या केल्या जात असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

रुग्णवाढीचा दर

  • मुंबईचा सरासरी दर  – ०.१४ टक्के
  • एम पश्चिम (चेंबूर, टिळकनगर) – ०.२८ टक्के
  • एल (कुर्ला) – ०.१७ टक्के
Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा