Advertisement

नागरिकांच्या सुरक्षेसाठी धारावीत पुन्हा चाचण्यांत वाढ

धारावीसह अन्य भागांत मोठ्या प्रमाणावर चाचण्या करण्याचा निर्णय घेतला असून शनिवारपासून सोमवापर्यंत चाचण्यांसाठी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

नागरिकांच्या सुरक्षेसाठी धारावीत पुन्हा चाचण्यांत वाढ
SHARES

मागील काही दिवसांमध्ये मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत हळूहळू वाढ होऊ लागली असून धारावीमधील कामगार वर्ग मोठ्या संख्येने कामानिमित्त मुंबईतील अन्य परिसरांत जात आहे. ही बाब लक्षात घेऊन धारावीसह अन्य भागांत मोठ्या प्रमाणावर चाचण्या करण्याचा निर्णय घेतला असून शनिवारपासून सोमवापर्यंत चाचण्यांसाठी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

लॉकडाऊनच्या काळात धारावीमधील परप्रांतीय कामगारांनी परराज्यातील गावची वाट धरली होती. यापैकी बहुतांश कामगार पुन्हा धारावीत दाखल झाले आहेत. ही मंडळी दररोज कामानिमित्त मुंबईच्या अन्य भागांत जात-येत असतात. त्याचबरोबर बाजारपेठांमुळे दादर परिसरात गर्दी होत आहे.

माहीममधील काही भागही गजबजून जात आहेत. ही बाब लक्षात घेऊन पालिकेच्या ‘जी-उत्तर’ विभागाने धारावीसह दादर, माहीम भागात पुन्हा एकदा मोठय़ा प्रमाणावर मोबाइल चाचणी शिबिरांचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे.

१३ ते १५ फेब्रुवारीदरम्यान या शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. १३ फेब्रुवारी रोजी ११ ठिकाणी, १४ फेब्रुवारी रोजी २ ठिकाणी, तर १५ फेब्रुवारी रोजी एका ठिकाणी या शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा