Advertisement

महापालिका, बेस्ट कर्मचाऱ्यांना तिसरी संधी

पहिल्या फळीतील कर्मचाऱ्यांसाठी अर्थात 'फ्रंटलाइन वर्कर्स'साठी कोविड लसीकरण सुरू असून, त्यात महापालिकेचे कर्मचारी व बेस्टच्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण केलं जात आहे.

महापालिका, बेस्ट कर्मचाऱ्यांना तिसरी संधी
SHARES

पहिल्या फळीतील कर्मचाऱ्यांसाठी अर्थात 'फ्रंटलाइन वर्कर्स'साठी कोविड लसीकरण सुरू असून, त्यात महापालिकेचे कर्मचारी व बेस्टच्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण केलं जात आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याला मोफत लसीकरणाच्या ३ संधी मिळणार असून, तीनही वेळेस कर्मचारी न गेल्यास त्याचे नाव मोफत लसीकरणाच्या यादीतून वगळण्यात येणार आहे.

मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कोविड लसीकरणासाठी गठित 'टास्क फोर्स'ची विशेष बैठक सोमवारी पार पडली. या बैठकीला उपायुक्त देवीदास क्षीरसागर, संचालक रमेश भारमल यांच्यासह विविध खात्यांचे खातेप्रमुख व संबंधित अधिकारी उपस्थित होते. सर्व खाते प्रमुखांनी व अधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन आधी स्वत: लस घ्यावी व त्यानंतर आपल्या अखत्यारीतील इतर कर्मचाऱ्यांनाही लस घेण्यासाठी प्रेरित करावे, असंही काकाणी यांनी म्हटलं.

खाते प्रमुखांनी लसीकरण करतानाचे आपले छायाचित्र आपल्या खात्याचा ‘व्हाट्सअप ग्रुप’ असल्यास त्यावर शेअर करावे. जेणेकरून इतर कर्मचाऱ्यांना लसीकरणाबाबत प्रेरणा मिळू शकेल, असेही सुचवण्यात आले. महापालिकेच्या एखाद्या खात्यातील १० किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचारी एकाच वेळी लसीकरणास जाणार असतील, तर त्यासाठी महापालिकेद्वारे वाहन व्यवस्था करता येऊ शकणार आहे.



हेही वाचा -

कोरोना रुग्णांमध्ये वाढ, राज्य सरकार मोठा निर्णय घेणार?

तर लाॅकडाऊन हाच शेवटचा पर्याय, राजेश टोपेंचा इशारा


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा