Advertisement

कोरोना रुग्णांमध्ये वाढ, राज्य सरकार मोठा निर्णय घेणार?

राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पुन्हा वाढत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य सरकार याबाबत मोठा निर्णय घेणार असल्याचे संकेत दिले आहेत.

कोरोना रुग्णांमध्ये वाढ, राज्य सरकार मोठा निर्णय घेणार?
SHARES

राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची (coronavirus patient) संख्या पुन्हा वाढत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य सरकार याबाबत मोठा निर्णय घेणार असल्याचे संकेत दिले आहेत. "कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुणीही मास्क घालत नाही हे अत्यंत गंभीर आहे. याची आपल्याला मोठी किंमत चुकवावी लागेल", असा इशारा अजित पवार यांनी दिला आहे.

औरंगाबादमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, राज्यात मागच्या २ आठवड्यांत २० हजार २११ करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने पुन्हा एकदा डोकं वर काढताना दिसत आहे. अनेक नागरिक आणि ग्रामस्थ मास्क वापरत नाहीत हे अत्यंत घातक आहे. याची आपल्याला मोठी किंमत चुकवावी लागेल. त्यामुळे गरज भासल्यास पुन्हा कठोर निर्णय घ्यावे लागतील, असं अजित पवार यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं. 

हेही वाचा- काँग्रेसकडे उपमुख्यमंत्रीपद निश्चित? मंत्रिमंडळातही फेरबदलाची शक्यता

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणूनच राज्य सरकारने शिवजयंती साधेपणाने साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. तरीही काही जण शिवजयंतीवर बंधनं का आणता? असा प्रश्न उपस्थित करुन नाहक राजकारण करत आहेत. कोरोनाच्या विषयावर राजकारण करुन कुणीही लोकांना भावनिक करू नये. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता राजकीय पक्षांनाही नियम घालून दिले पाहिजेत, असंही अजित पवार (ajit pawar) म्हणाले. तसंच मंगळवारी मुख्यमंत्र्यांना भेटून यासंबंधी चर्चा करणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.

दरम्यान, राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. रविवारी राज्यात ४ हजारावर नवीन कोरोनाबाधितांची भर पडली आहे. कोरोना लसीकरणात प्रशासकीय यंत्रणा गुंतलेली असताना कोरोना रुग्णांची संख्या वाढत राहिल्यास त्यांच्यावर पुन्हा भार पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

(deputy cm ajit pawar reacts on coronavirus infection in maharashtra)

हेही वाचा- राज्यपाल न्यायालयात जाण्याची वेळ येऊ देणार नाहीत- अजित पवार

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा