Advertisement

राज्यपाल न्यायालयात जाण्याची वेळ येऊ देणार नाहीत- अजित पवार

भगत सिंह कोश्यारी विधान परिषेदच्या १२ जागांसाठी न्यायालयात जाऊ देण्याची वेळ येऊ देणार नाहीत, असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रश्नावरून राज्यपालांना अप्रत्यक्षरित्या इशाराच दिला आहे.

राज्यपाल न्यायालयात जाण्याची वेळ येऊ देणार नाहीत- अजित पवार
SHARES

राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेवर नियुक्त करण्यात येणाऱ्या १२ सदस्यांच्या नावाची यादी पाठवून देखील राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या सदस्यांची निवड न केल्याने सत्ताधारी महाविकास आघाडीमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. भगत सिंह कोश्यारी विधान परिषेदच्या १२ जागांसाठी न्यायालयात जाऊ देण्याची वेळ येऊ देणार नाहीत, असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी या प्रश्नावरून राज्यपालांना अप्रत्यक्षरित्या इशाराच दिला आहे.

राज्यपाल कोट्यातून नियुक्त करावयाच्या विधान परिषदेतील १२ जागा मागील काही महिन्यांपासून रिक्त आहेत. राज्यपालांनी कुठल्याही नावावर आक्षेप घेऊ नये म्हणून महाविकास आघाडी सरकारने मोठा विचार करून सदस्यांची नावं राज्यपालांकडे नियुक्तीसाठी पाठवली आहे. परंतु दोन महिने उलटूनही राज्यपालांनी त्यावर निर्णय घेतलेला नाही. त्यामुळं महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. 

हेही वाचा- काँग्रेसकडे उपमुख्यमंत्रीपद निश्चित? मंत्रिमंडळातही फेरबदलाची शक्यता

नाशिकच्या दौऱ्यावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अजित पवार (ajit pawar) यांनी शेतकरी आंदोलन आणि १२ आमदारांच्या नियुक्तवर भाष्य केलं. ते म्हणाले, विधान परिषदेसाठी नावांची शिफारस करताना महाविकास आघाडी सरकाने सगळे नियम, अटी पाळल्या आहेत. मंत्रिमंडळात ठराव देखील मंजूर करण्यात आला आहे. सभागृहात पूर्ण बहुमत असलेल्या मुख्यमंत्री महोदयाच्या सहीनं १२ नावांची यादी पाठवण्यात आली आहे. एवढं सगळं असतानाही ज्यांनी अंतिम निर्णय घ्यायचा, ते सही करत नाही. राज्यपाल लवकरच यासंदर्भात आपली भूमिका जाहीर करतील आणि आम्हाला न्यायालयात जाऊ देण्याची वेळ येऊ देणार नाहीत, असं म्हणत अजित पवार यांनी राज्यपालांना सूचक इशारा दिला.

आता आम्हाला कधीतरी त्यांना भेटून किती वेळ थांबायचं हे विचारावं लागेल. नियुक्तीचा अधिकार त्यांचा असला तरी त्याला काही काळवेळ, मर्यादा आहेच ना,' असंही अजित पवार म्हणाले.

(ajit pawar slams governor on maharashtra vidhan parishad member selection)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा