Advertisement

काँग्रेसकडे उपमुख्यमंत्रीपद निश्चित? मंत्रिमंडळातही फेरबदलाची शक्यता

काँग्रेस नेते आमदार नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देत महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचं अध्यक्षपद हाती घेतल्यानंतर आता ठाकरे मंत्रिमंडळात देखील फेरबदल होण्याची चिन्हे आहेत.

काँग्रेसकडे उपमुख्यमंत्रीपद निश्चित? मंत्रिमंडळातही फेरबदलाची शक्यता
SHARES

काँग्रेस नेते आमदार नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देत महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचं अध्यक्षपद हाती घेतल्यानंतर आता ठाकरे मंत्रिमंडळात देखील फेरबदल होण्याची चिन्हे आहेत. विशेषकरून काँग्रेसकडील (congress) मंत्रीपदाच्या जबाबदाऱ्यांमध्ये हे बदल होणार आहेत. एवढंच नाही, तर काँग्रेसच्या वाट्याला उपमुख्यमंत्रीपद येण्याची दाट शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे.

काँग्रेस हायकमांडने गेल्याच आठवड्यात नाना पटोले यांना विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास सांगितलं होतं. राजीनाम्यानंतर पटोले यांच्या हाती महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली. यामुळे रिक्त झालेल्या विधानसभा अध्यक्षपदावर शिवसेनेने (shiv sena) दावा केला असून त्याबदल्यात आणखी एक उपमुख्यमंत्रीपद तयार करून ते काँग्रेसला देण्याची तयारी दाखवली आहे. 

हेही वाचा- मिरा भाईंदरमधील रहिवाशांनो, 'या' दिवशी पाणीच येणार नाही

शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसंच काँग्रेस या प्रस्तावाबाबत सकारात्मक असल्याचंही म्हटलं जात आहे. परंतु आणखी एक उपमुख्यमंत्रीपद तयार करण्यास आणि विधानसभा अध्यक्षपदावरील दावा सोडण्यास राष्ट्रवादी काँग्रेसची (ncp) तयारी आहे किंवा नाही हे अद्याप कळू शकलेलं नाही. 

या प्रस्तावाबाबत तिन्ही पक्षांच्या नेत्याचं एकमत झाल्यास उपमुख्यमंत्री म्हणून ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची या पदावर वर्णी लागू शकते, असं म्हटलं जात आहे. नितीन राऊत (nitin raut) यांनी नुकतीच नाना पटोले यांच्यासोबत दिल्लीत जाऊन काँग्रेसच्या प्रभारी अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेतल्याने राऊत यांचं नाव जवळपास निश्चित झाल्याचं म्हटलं जात आहे.

त्यातच नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपद स्वीकारताना मंत्रिपदाचा आग्रह देखील धरल्याने त्यांना देखील मंत्रिपद मिळू शकतं. काँग्रेसमधील जो नेता उपमुख्यमंत्रीपद हाती घेईल, त्या नेत्याचं मंत्रिपद पटोले यांना देण्यात येईल, हे काँग्रेस हायकमांडने त्यांना सांगितल्याचं म्हटलं जात आहे. याबाबत लवकरच काय ते चित्र समोर येईल.

(congress minister nitin raut might get deputy cm post in maharashtra)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा