Advertisement

मिरा भाईंदरमधील रहिवाशांनो, 'या' दिवशी पाणीच येणार नाही

पाणी विभागानं दिलेल्या माहितीनुसार, २४ तास पाणी पुरवठा खंडित करण्यात येणार आहे.

मिरा भाईंदरमधील रहिवाशांनो, 'या' दिवशी पाणीच येणार नाही
SHARES

मीरा-भाईंदरमध्ये ११ फेब्रुवारीला २४ तास पाणीपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. मीरा-भाईंदर पालिकेनं यासंदर्भात माहिती दिली आहे. पाणी विभागानं दिलेल्या माहितीनुसार, २४ तास पाणी पुरवठा खंडित करण्यात येणार आहे. १० फेब्रुवारी रात्री १२ ते ११ फेब्रुवारी रात्री १२ या वेळेत पाणी येणार नाही.

पाणीपुरवठा योजने अंतर्गत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळानं जांभूळ इथल्या बर्वी जल उपचार केंद्रात जलवाहिनी देखभाल आणि दुरुस्तीचे काम हाती घेतल्यानं पाणीपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. तथापि, एसटीईएम(STEM)कडून पाणीपुरवठा सुरू राहील.

पाणी कपात करण्यात आल्यानं नागरिकांनी १० फेब्रुवारीला पाण्याचा साठा करावा. याशिवाय पाण्याचा वापर कमी करावा, असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. एमआयडीसी आणि एसटीईएम पाणीपुरवठा प्राधिकरण संयुक्तपणे दुहेरी शहरांना पाणीपुरवठा करते.



हेही वाचा

मुंबईत पावसाळ्यापूर्वीच्या नालेसफाई कामाला सुरुवात

समुद्राचं पाणी पिण्यायोग्य बनवण्याच्या प्रकल्पाला मान्यता

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा