टाटा ग्रृपचे चेअरमन रतन टाटा मुंबईतील एका 18 वर्षीय तरुणाच्या औषध कंपनीत भागीदार झाले आहेत. 'जेनरिक आधार' असं या कंपनीचे नाव असून या कंपनीत रतन टाटा यांनी 50 टक्के भागीदारी खरेदी केली आहे.
जेनरिक आधारकडून वार्षिक 6 कोटींची विक्री होते. अर्जुन देशपांडेने त्याची कंपनी सुरू करताना यूनीक फार्मेसी एग्रीगेटर बिजनेस मॉडेल स्वीकारले आहे. यामध्ये थेट उत्पादकांकडून औषधांची खरेदी करून त्याची विक्री किरकोळ दुकानदारांना केली जाते. टाटांच्या भागीदारीमुळे कंपनीच्या विस्तारासाठी मोठा फायदा होणार आहे. मुंबई, पुणे, बेंगळुरु आणि ओडिशामधील जवळपास 30 रिटेलर्स या कंपनीशी जोडले गेले आहेत.
या कंपनीमध्ये एकूण 55 कर्मचारी असून त्यामध्ये फार्मासिस्ट, आयटी इंजीनिअर आणि मार्केटिंग प्रोफेशनल्स आहेत. एका वर्षामध्ये जेनरिक आधारच्या 1000 फ्रँचायझी सुरू करण्याचा मानस आहे. या कंपनीचा विस्तार महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, तमिळनाडू आणि दिल्लीमध्ये करण्यात येणार असल्याची माहिती अर्जुन देशपांडेने दिली.
हेही वाचा -