RBI ची रेपो दरात ०.२५% ची कपात

भारतीय रिझर्व बँकेने द्विमासिक पतधोरण आढावा जाहीर करताना रेपो दरात ०.२५ टक्क्यांची कपात केली आहे. आरबीआयच्या या निर्णयामुळं गृहकर्ज स्वस्त होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नव्या दरानुसार रेपो दर ६.०० टक्क्यांहून ५.७५ टक्क्यांवर आला आहे. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ६ सदस्यीय पतधोरण समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

कर्ज स्वस्त होणार

रेपो दरात कपात झाल्यानं बँकांना आरबीआयकडून स्वस्त दरात निधी उपलब्ध होईल. त्यामुळं बँका गृहकर्जे, वाहन कर्जासह इतर कर्जे कमी व्याजदरात देऊ शकतील. आरबीआयच्या या निर्णयामुळं नवीन कर्ज स्वस्त होणार आहे, तर कर्ज घेतलेल्या कर्जदारांच्या 'ईएमआय'मध्ये कपात किंवा रिपिटेड कालावधीत कपातीचा फायदा होण्याची शक्यता आहे.

दुसरं तिमाही पतधोरण

आरबीआयचं चालू वित्तीय वर्षाचं हे दुसरं तिमाही पतधोरण आहे. आरबीआयनं या पूर्वी एप्रिल महिन्यात रेपो दरात ०.२५ टक्क्यांची कपात केली होती.


हेही वाचा -

वंदे भारत एक्सप्रेस धावणार मुंबई ते पुणे, नाशिक आणि बडोदा मार्गावर?

सर्व खासदारांसह उद्धव ठाकरे पुन्हा एकदा अयोध्येला जाणार


पुढील बातमी
इतर बातम्या