उद्धव ठाकरे पुन्हा करणार अयोध्या वारी!

लोकसभा निवडणुकांअगोदर उद्धव ठाकरे यांचा अयोध्येचा दौरा खूपचं गाजला होता. त्यानंतर आता उद्धव ठाकरे पुन्हा एकदा अयोध्येला जाणार आहेत.

उद्धव ठाकरे पुन्हा करणार अयोध्या वारी!
SHARES

लोकसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अयोध्येला जाऊन प्रभू रामाचं दर्शन घेतलं होतं. लोकसभा निवडणुकांअगोदर उद्धव ठाकरे यांचा अयोध्येचा दौरा खूपचं गाजला होता. त्यानंतर आता उद्धव ठाकरे पुन्हा एकदा अयोध्येला जाणार आहेत. येत्या १६ जून रोजी उद्धव ठाकरे आपल्या नवनिर्वाचित खासदारांसहीत अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार आहेत.

अयोध्येला जाण्याची घोषणा

मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात उद्धव ठाकरे अयोध्येला गेले होते. त्यावेळी त्यांनी राम मंदिर उभारण्याची मागणी केली होती. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आता पुन्हा त्यांनी अयोध्येला जाण्याची घोषणा केली आहे. १६ जून रोजी सर्व खासदारांसोबत ते अयोध्येला जाणार आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपनं जागांचं फिफ्टी-फिफ्टी वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच, मित्रपक्षांना केवळ १८ जागा सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

संसदेचं अधिवेशन

कार्ला गडावर एकवीरा देवीच्या आणि अंबाबाईच्या दर्शनानंतर उद्धव ठाकरे अयोध्येत दाखल होणार आहेत. त्यावेळी पुन्हा एकदा राममंदिर प्रश्न धसास लावण्यासाठी शंख फुंखणार असल्याची माहिती मिळत आहे. १७ जून रोजी संसदेचं अधिवेशन सुरू होणार आहे. त्यामुळं संसद अधिवेशना अगोदरच हा कार्यक्रम आखण्यात येत आहे.हेही वाचा -

खडवली स्थानकाजवळ रुळाला तडे, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

विनातिकीट प्रवास करणाऱ्यांकडून ११.१४ कोटींचा दंड वसूल, मध्य रेल्वेची कारवाईसंबंधित विषय