Advertisement

विनातिकीट प्रवास करणाऱ्यांकडून ११.१४ कोटींचा दंड वसूल, मध्य रेल्वेची कारवाई

मध्य रेल्वेनं मे २०१८ ते मे २०१९ या काळात विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून सुमारे ११.१४ कोटी रुपये दंड वसून केला आहे. तब्बल १,९०,६८० विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून ही रक्कम वसूल करण्यात आली आहे.

विनातिकीट प्रवास करणाऱ्यांकडून ११.१४ कोटींचा दंड वसूल, मध्य रेल्वेची कारवाई
SHARES

दिवसेंदिवस रेल्वेनं विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत प्रचंड वाढ होताना पाहायला मिळते आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागानं या प्रवाशांमध्ये ५० टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती दिली. तसंच, मध्य रेल्वेनं मे २०१८ ते मे २०१९ या कालावधीत विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून सुमारे ११.१४ कोटी रुपये दंड वसून केला आहे. तब्बल १,९०,६८० विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून ही रक्कम वसूल करण्यात आली आहे. गेल्या वर्षी मध्य रेल्वेनं १,२५,५२९ विनातिकीट प्रवाशांकडून ६ कोटी रुपये वसूल केले होते.



विशेष मोहिम

विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्यासाठी मध्य रेल्वेमार्फत मुंबई विभागात विशेष मोहिम राबवण्यात आली आहे. या मोहीमेर्तंगत रेल्वे स्थानकांच्या प्रवेशद्वारांवर आणि बाहेर पडण्याच्या मार्गांवर वाढीव कर्मचारी तैनात करण्यात आले होते. त्याशिवाय भरारी तिकीट तपासणीवर विशेष लक्ष देण्यात आलं होतं. अनेकदा काहीजण गर्दीचा फायदा विनातिकीट प्रवास करतात. अशा प्रवाशांवर मध्य रेल्वेकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.


दंडात्मक कारवाई

मुंबईप्रमाणं देशात देखील रेल्वेनं विनातिकीट प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. २०१४-१५ मध्ये देशभरात १.८७ कोटी विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. देशभरात अंदाजे दररोज ७५,००० प्रवाशी विनातिकीट अथवा अयोग्य तिकीटावर प्रवास करतात. या प्रवाशांवर केलेल्या दंडात्मक कारवाईतून भारतीय रेल्वेच्या तिजोरीत एप्रिल २०१४ ते मार्च २०१९ या काळात ५,९४४.७१ कोटी रुपयांची भर पडली आहे.



हेही वाचा -

वंदे भारत एक्सप्रेस धावणार मुंबई ते पुणे, नाशिक आणि बडोदा मार्गावर?

८ जूनला मान्सून केरळात दाखल होणार, तर १३ जूननंतर मुंबईत पावसाची शक्यता



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा