Advertisement

आठवड्याभरात मुंबईत धडकणार मान्सून

मान्सून येत्या ४८ ते ७२ तासांत म्हणजेच ८ जूनला केरळात दाखल होईल, असा अंदाज हवामान खात्यासह स्कायमेटनं वर्तवला आहे. त्याशिवाय, येत्या २४ तासांत विदर्भात वादळ व काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

आठवड्याभरात मुंबईत धडकणार मान्सून
SHARES

दिवसेंदिवस वाढणाऱ्या उकाड्यामुळं मुंबईसह राज्यभरातील नागरिकांना आता पावसाची प्रतीक्षा लागली आहे. दरवर्षी श्रीलंकेत मे महिन्यात दाखल होणारा मान्सून यंदा ८ ते १० दिवसांनी उशीरा दाखल झाला आहे. त्यामुळं मान्सून येत्या ४८ ते ७२ तासांत म्हणजेच ८ जूनला केरळात दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्यासह स्कायमेटनं वर्तवला आहे. त्याशिवाय, येत्या २४ तासांत विदर्भात वादळ व काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे.

विदर्भात उष्णतेची लाट

स्कायमेटनं वर्तवलेल्या अंदाजानुसार, ६ जूनला मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी विजांचा कडकडाट होणार असून, मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा वाहणार असून, विदर्भात उष्णतेची लाट ही राहणार आहे. तसंच ७ ते ९ जूनपर्यंत विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा वाहणार आहे. तसंच, मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी उष्णतेची लाट राहणार आहे.

मुंबईत मान्सून उशीरा

केरळात मान्सून ८ जूनला दाखल होणार आहे. त्यामुळं मुंबईत मान्सून उशीरा म्हणजे १३ जूननंतरच दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळं मुंबईकरांना आणखी काही दिवस पावसाची वाट पहावी लागणार आहे.



हेही वाचा -

वंदे भारत एक्सप्रेस धावणार मुंबई ते पुणे, नाशिक आणि बडोदा मार्गावर?



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा