RBI चे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांचा तडकाफडकी राजीनामा

रिझर्व्ह बँक आॅफ इंडिया (RBI)चे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.  आरबीआयच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी तडकाफडकी राजीनामा देण्याची ही मागील ७ महिन्यांतील दुसरी वेळ आहे. 

कार्यकाळ पूर्ण होण्याच्या ६ महिने आधीच आचार्य यांनी आपलं पद सोडलं आहे. आचार्य यांची डेप्युटी गव्हर्नरपदी ३ वर्षांकरीता नियुक्ती करण्यात आली होती. २३ जानेवारी २०१७ रोजी त्यांनी पदभार स्वीकारला होता. त्यांनी ३० महिने आरबीआयसाठी काम केलं.

याआधी आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनीही कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच राजीनामा दिला होता. डिसेंबर २०१८ मध्ये त्यांनी खासगी कारणांचा हवाला देत पद सोडलं होतं. त्यांच्या निर्णयाची देशभरात मोठी चर्चा झाली होती.

विरल आचार्य आणि ऊर्जित पटेल एकाच विचारसरणीचे मानले जातात. राजीनामा दिल्यानंतर आचार्य न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीच्या सेटर्न स्कूल ऑफ बिजनेसमध्ये प्राध्यापक म्हणून रूजू होणार असल्याची माहिती आहे.  


हेही वाचा-

अखेर जेट एअरवेज दिवाळखोरीत

विप्रोचे अझीम प्रेमजी जुलैत होणार निवृत्त


पुढील बातमी
इतर बातम्या