Advertisement

विप्रोचे अझीम प्रेमजी जुलैत होणार निवृत्त

विप्रोचे चेअरमन अझीम प्रेमजी (७३) यांनी गुरूवारी आपल्या निवृत्तीची घोषणा केली. त्यानुसार प्रेमजी ३० जुलै रोजी आपल्या पदावरून निवृत्त होतील. त्यानंतर ते कंपनीच्या संचालक मंडळात नाॅन-एक्झ्युक्युटीव्ह डायरेक्टर आणि फाऊंडर चेअरमन म्हणून कार्यरत राहतील.

विप्रोचे अझीम प्रेमजी जुलैत होणार निवृत्त
SHARES

विप्रोचे चेअरमन अझीम प्रेमजी (७३) यांनी गुरूवारी आपल्या निवृत्तीची घोषणा केली. त्यानुसार प्रेमजी ३० जुलै रोजी आपल्या पदावरून निवृत्त होतील. त्यानंतर ते कंपनीच्या संचालक मंडळात नाॅन-एक्झ्युक्युटीव्ह डायरेक्टर आणि फाऊंडर चेअरमन म्हणून कार्यरत राहतील.  

प्रेमजी गेल्या ५३ वर्षांपासून विप्रोचं नेतृत्व करत आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीतील शिक्षण सोडून १९९६ मध्ये त्यांनी विप्रोचा कारभार हाती घेतला होता. त्यावेळी विप्रो केवळ खाद्यतेलाच्या व्यवसायात होती. १९८२ मध्ये कंपनीने आयटी सर्व्हिसेसमध्ये शिरकाव केला.

नव्या पदावर 

अझीम प्रेमजी यांचे पूत्र रिषद प्रेमजी (४१) यांची कंपनीच्या एक्झ्युक्युटीव्ह चेअरमनपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या रिषद विप्रोचे चीफ स्ट्रॅटर्जी आॅफिसर असून ते संचालक मंडळाचे सदस्यही आहेत. तसंच सध्याचे सीईओ आणि एक्झ्युक्युटीव्ह डायरेक्टर आबिद अली नीमचवाला यापुढे सीईओ आणि एमडी हे पद सांभाळतील. नवे बदल शेअरधारकांच्या मंजुरीनंतर ३१ जुलैपासून लागू होतील.  

तिसऱ्या क्रमांकाची कंपनी

विप्रो देशातील तिसऱ्या क्रमांकाची आयटी कंपनी आहे. पहिल्या क्रमांकावर टीसीएस, तर दुसऱ्या क्रमांकावर इन्फोसिस आहे. विप्रोची मार्केट कॅप १.७६ लाख कोटी रुपये आहे. जगातील मोठ्या बँका आणि हेल्थकेअर कंपन्या विप्रोच्या क्लायंट आहेत.  

नेटवर्थ १.५५ लाख कोटी रुपये

ब्लूमबर्ग बिलेनियर इंडेक्स नुसार प्रेमजी जगातील ३६ वे सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती आहे. त्यांची नेटवर्थ २२.२ अब्ज डॉलर (१.५५ लाख कोटी रुपए) एवढी आहे. मार्चमध्ये त्यांनी विप्रोतील आपल्या शेयरहोल्डिंग व्यतिरिक्त ३४% शेअर्स दान करण्याचा निर्णय घेतला होता. या शेअर्सचं मूल्य ५२,७५० कोटी रुपये आहे. प्रेमजी यांनी आपल्या सामाजिक संस्थेद्वारे आतापर्यंत १.४५ लाख कोटी रुपये समाजकार्यासाठी दिले आहेत.

लायक असेल, तोच विप्रो सांभाळेल 

आपल्या मुलाकडे कंपनीचा पदभार कधी सोपवणार ? असा प्रश्न विचारल्यावर अत्यंत मोठा आणि गुंतागुंतीचा व्यवसाय असाच मुलाच्या हातात देता येणार नाही. जो या पदासाठी लायक असेल, तोच विप्रो सांभाळेल, असं प्रेमजी एका मुलाखती दरम्यान म्हणाले होते. 

रिषदने २००७ मध्ये विप्रोमध्ये प्रवेश केला होता. रिषदची विप्रोत इतर कर्मचाऱ्यांप्रमाणेच निवड झाली होती. रिषदने हाॅर्वर्ड बिझनेस स्कूलमधून एमबीए केलं असून विप्रो येण्याआधी त्यांनी २ वर्षे लंडन येथील बेन अँड कंपनीत कन्सल्टंट म्हणून काम केलं होतं. काही काळ त्यांनी अमेरिकेतील जीई कॅपिटलमध्येही काम केलं आहे.   

 


हेही वाचा-

RBI ची रेपो दरात ०.२५% ची कपात

आरटीजीएस, एनईएफटी शुल्क रद्द; आरबीआयचा निर्णय



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा