Advertisement

अखेर जेट एअरवेज दिवाळखोरीत

आर्थिक अडचणीत आलेल्या जेट एअरवेजचं पुनरुज्जीवन करण्यात स्टेट बँकेच्या नेतृत्वाखालील बँक समूहाला अपयश आल्याने आता जेट दिवाळखोरीत जाणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

अखेर जेट एअरवेज दिवाळखोरीत
SHARES

आर्थिक अडचणीत आलेल्या जेट एअरवेजचं पुनरुज्जीवन करण्यात स्टेट बँकेच्या नेतृत्वाखालील बँक समूहाला अपयश आल्याने आता जेट दिवाळखोरीत जाणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.   

हिस्सा विकण्यात अपयश

जेट एअरवेजला पुनरुज्जीवन देण्यासाठी बँक समूहाकडून गेल्या ५ महिन्यांपासून प्रयत्न सुरू होते. दरम्यान जेटची आर्थिक स्थिती अधिकच बिघडल्याने १७ एप्रिलला जेटची सेवा तात्पुरती खंडित करण्यात आली. जेटमधील भांडवली हिस्सा विकून देणी वसूल करण्याचा निर्णय स्टेट बँकेने घेतला होता. त्यानुसार जेटमध्ये २४ टक्के हिस्सा असणाऱ्या एतिहादने हिंदुजा समूहाच्या मदतीने जेटचा कारभार स्वीकारण्याची तयारी दाखवली होती. परंतु त्यांच्या अटी बँकांच्या समूहास मान्य झाल्या नाहीत.  

दिवाळखोरीचा एकमेव मार्ग

या व्यतीरिक्त एकाही कंपनीने व्यवहार्य निविदा सादर न केल्यानं जेटची समस्या सोडवण्यासाठी दिवाळखोरीव्यतिरिक्त इतर कुठलाच मार्ग उरला नाही, असं स्टेट बँकेने म्हटलं. यासंदर्भात सोमवारी झालेल्या बँक समूहाच्या बैठकीत जेटची समस्या दिवाळखोरी प्रक्रियेतूनच सोडवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार जेटकडून येणारी ८,५०० कोटी रुपयांची थकीत रक्कम दिवाळखोरीतूनच वसूल करण्यात येईल. सद्यस्थितीत एकूण कर्ज आणि तोटा मिळून जेटमधील आर्थिक तूट ३५ हजार कोटी रुपयांवर पोहोचली आहे.   

बँक समूहाकडून लवकरच जेटविरोधात दिवाळखोरीविरोधी कायद्यांतर्गत (आयबीसी कोड) राष्ट्रीय कंपनी विधि न्यायाधिकरणाकडे (एनसीएलटी) याचिका दाखल करण्यात येणार आहे.  



हेही वाचा-

जेटच्या २ हजार कर्मचाऱ्यांना स्पाईस जेटकडून नोकरी

जेटच्या कर्मचाऱ्यांच्या न्यायासाठी हस्तक्षेप करण्यासाठी आयटीएफचं पंतप्रधानांना पत्र



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा