Advertisement

जेटच्या कर्मचाऱ्यांच्या न्यायासाठी हस्तक्षेप करण्यासाठी आयटीएफचं पंतप्रधानांना पत्र

जेटच्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्याकरीता हस्तक्षेप करा, अशी मागणी करणारं पत्र आंतरराष्ट्रीय वाहतूक कामगार फेडरेशननं (आयटीएफ) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवलं आहे.

जेटच्या कर्मचाऱ्यांच्या न्यायासाठी हस्तक्षेप करण्यासाठी आयटीएफचं पंतप्रधानांना पत्र
SHARES

जेट एअरवेज कंपनी बंद पडल्यानं जेटच्या २२ हजार ५०० कर्मचाऱ्यांनाम मागील अनेक दिवसांपासून आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो आहे. त्यामुळं या कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्याकरीता हस्तक्षेप करा, अशी मागणी करणारं पत्र आंतरराष्ट्रीय वाहतूक कामगार फेडरेशननं (आयटीएफ) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवलं आहे. पंतप्रधानांनी या समस्येची दखल घ्यावी, जेटच्या कर्मचाऱ्यांना त्यांचं थकीत वेतन, भविष्य निर्वाह निधीची रक्कम मिळवून द्यावी, तसंच त्यांना रोजगार मिळण्यासाठी प्रयत्न करावा, अशी मागणी आयटीएफनं केली आहे.


समस्यांची दखल

जेट एअरवेज बंद पडल्यानं कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या नोकऱ्या बुडाल्या असून, त्यांच्यासमोर अस्तित्वाचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. त्यामुळं लंडन इथं मुख्यालय असलेल्या आयटीएफनं जेटच्या कर्मचाऱ्यांच्या समस्यांची दखल घेतली असून, या समस्या पंतप्रधानांना कळविल्या आहेत.


आयटीएफची मागणी

जेटचे वरिष्ठ कर्मचारी, अधिकारी, तंत्रज्ञ व वैमानिकांना जानेवारीपासूनचे वेतन मिळालेलं नाही आहे. तसंच, इतर कर्मचारी व अधिकाऱ्यांना मार्च महिन्याचं वेतन मिळालेलं नाही. त्याशिवाय, कामगारांचे कोणतेही हक्क डावलले जाऊ नयेत व त्यांना त्यांची सर्व देणी लवकर मिळाण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी आयटीएफनं केली आहे.


पत्राची दखल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविलेल्या पत्राची पंतप्रधान कार्यालयाकडून दखल घेण्यात आली आहे. तसंच, लवकरच या प्रकरणी कार्यवाही करण्यात येणार असल्याचं समजतं आहे. त्यामुळं येत्या काळात जेटच्या कर्मचाऱ्यांचं आर्थिक संकट दुर होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे



हेही वाचा -

शिवसेनेकडून खासदार अरविंद सावंत घेणार मंत्रीपदाची शपथ



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा