Advertisement

शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत घेणार मंत्रीपदाची शपथ

दक्षिण मुंबईतील शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत नरेंद्र मोदी सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. खा. अरविंद सावंत यांना गुरूवारी केद्रीय मंत्रीपदासाठी शपथ दिली जाणार आहे.

शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत घेणार मंत्रीपदाची शपथ
SHARES

दक्षिण मुंबईतील शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत नरेंद्र मोदी सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. खा. अरविंद सावंत यांना गुरूवारी केद्रीय मंत्रीपदासाठी शपथ दिली जाणार आहे. नरेंद्र मोदींच्या पूर्वीच्या सरकारमध्ये शिवसेनेचे एकमेव मंत्री अनंत गीते यांची जागा अरविंद सावंत घेणार असल्याचं बुधवारी शिवसेना नेत्यांनी सांगितलं. त्याशिवाय, रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांना अखेर पंतप्रधान कार्यालयातून फोन आला असून, केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचं शिक्कमोर्तब झालं आहे. 


,००,०६७ मतांनी विजयी

लोकसभा निवडणुकीच्या दक्षिण मुंबई मतदारसंघातील शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा यांचा १,००,०६७ मतांनी पराभव केला आहे. त्याशिवाय, दुसऱ्यांदा त्यांनी लोकसभा निवडणूक जिंकली आहे.


राष्ट्रपती भवनात शपथविधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नव्या मंत्रिमंडळाचा गुरुवारी संध्याकाळी ७ वाजता दिल्लीतील राष्ट्रपती भवनात शपथविधी होणार आहे. गुरुवारी पंतप्रधानांसह महत्त्वाच्या कॅबिनेट मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. यामध्ये दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत गुरुवारी मोदी यांच्या मंत्रिमंडळात शपथ घेणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.


भेटण्याचं निमंत्रण

रामदास आठवले यांच्या समर्थकांनी कोणतीही अधिकृत घोणषा होण्याआधीच जल्लोषाची तयारी केली होती. शपथविधीसाठी आपल्याला देखील फोन येईल असा विश्वास रामदास आठवले व्यक्त करत होते. पण कोणतीही अधिकृत माहिती नसल्यानं नेमकं काय होणार याची सर्वांना उत्सुकता होती. मात्र, अखेर रामदास आठवले केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेणार हे ठरलं आहे. रामदास आठवले यांना पंतप्रधान कार्यालयातून फोन आला असून ४.३० वाजता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भेटण्याचं निमंत्रण दिले आहे. आज सायंकाळी केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेण्याचे अधिकृत निमंत्रण रामदास आठवले यांना प्राप्त झाले आहे अशी माहिती देण्यात आली आहे.हेही वाचा -

महाआघाडीची तयारी? राज ठाकरे, शरद पवार यांच्यात ४५ मिनिटे गुफ्तगूRead this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement