RTGS व्यवहारांचा वेळ १ तासाने वाढला, आरबीआयचा निर्णय

आॅनलाइन पैसे देवाण-घेवाणीचे व्यवहार करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. रिझर्व्ह बँकेने RTGS (रियल टाइम ग्रॉस सेटलमेंट प्रणाली -आरटीजीएस) व्यवहारांचा वेळ आता १ तासाने वाढवला आहे. डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी आरबीआयने हा निर्णय घेतला आहे. हा निर्णय सोमवारपासून म्हणजे २६ आॅगस्टपासून लागू होणार आहे.

'ह्या' वेळेत व्यवहार

आता ग्राहकांना सकाळी ८ वाजताच्या एेवजी सकाळी ७ वाजल्यापासून RTGS मधून व्यवहार करता येणार आहेत. बँक ग्राहकांना सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत RTGS ने पैसे पाठवता येणार आहेत. तर इंटर बँक व्यवहारांची वेळ आता सकाळी ७ ते रात्री ७.४५ अशी झाली आहे

अशी आहे RTGS प्रणाली

RTGS माध्यमातून पैसे तात्काळ पाठवता येतात. या प्रणालीमार्फत व्यक्तिगत खातेधारकांना तसंच एकाचवेळी अनेक ग्राहकांना पैसे पाठवता येतात. मुख्यतः मोठ्या व्यवहारांसाठी RTGS चा वापर केला जातो. यामध्ये कमीत कमी २ लाख रुपये पाठवता येतात. तर जास्तीत जास्त कितीही रक्कम पाठवता येते. RTGS शिवाय NEFT या प्रणालीचाही पैसे पाठवण्यासाठी उपयोग होतो. NEFT ने पैसे पाठवण्याची वेळ सकाळी ८ ते सायंकाळी ७ अशी आहे. यामध्ये मात्र २ लाख रुपयांपर्यंतच पैसे पाठवता येतात.


हेही वाचा  -

आर सीटी मॉलमध्ये ओपन होणार IKEAचं शॉप

अर्थव्यवस्थेची वाटचाल मंदीच्या दिशेने?


पुढील बातमी
इतर बातम्या