Advertisement

आर सीटी मॉलमध्ये ओपन होणार IKEAचं शॉप

मुंबईतल्या घाटकोपर येथील आर सीटी मॉलमध्ये शॉप उघडणार आहे.

आर सीटी मॉलमध्ये ओपन होणार IKEAचं शॉप
SHARES

घरगुती सामानाची विक्री करणारी स्वीडनची प्रमुख कंपनी 'आयकीया'नं (ikea) मुंबईत ऑनलाइन स्टोअर (Online Store) सुरू केलं आहे. अशातच आता ही कंपनी मुंबईतल्या घाटकोपर येथील आर सीटी मॉलमध्ये शॉप उघडणार आहे. यासाठी स्वीडन कंपनी आयकीया ही रनवाल ग्रुपसह मॉलमधील दुसऱ्या मजल्यावर असलेल्या जागेत हे शॉप उघडणार आहे.  

ऑनलाईन स्टोअर

आयकीया कंपनी मुंबईत ऑनलाईन स्टोअर सुरू करणार असून, या स्टोअरमध्ये ७ हजार ५०० उत्पादनं उपलब्ध करणार आहे. तसंच, स्टोअरमधील १००० उत्पादनांची किंमत २०० रुपयांपेक्षा कमी असणार आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, भारतात ऑफलाइन आणि ऑनलाईन या २ प्लॅटफॉर्मवर उत्पादनांच्या किंमतीवर काहीच फरक नसेल. 

घरगुती सामान

भारतात आयकीयाचे ५५हून अधिक पुरवठाधारक आहेत. यामध्ये डिलेवरी करणारे ४ लाख असून, यामधील ४५ हजार जण रोजगाराच्या उद्धिष्ट्यानं जोडले गेलेले आहेत. या कंपनीच्या हैद्राबाद इथं असलेल्या पहिल्या स्टोअरमध्ये आतापर्यंत ३० लाखाहून अधिक ग्राहकांनी भेट दिल्याची माहिती मिळते. कोणत्याही घरगुती सामानाची ऑर्डर केल्यावर कंपनी पुढील ४ दिवसांत समानाची डिलेवरी करते. एखादा ग्राहक आयकीया कंपनीचा मेंबर असेल तर त्याला ९० दिवसांत सामान परत पाठवता येणार आहे. मात्र, मेंबर नसल्यास ६० दिवसांत सामान पाठवता येणार आहे.



हेही वाचा -

गणेशोत्सव २०१९: ऐन सणासुदीच्या काळात सुका मेव्याच्या किमतीत वाढ

प्रलंबित मागण्यासाठी मराठा क्रांतीचा मोर्चा



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा