Advertisement

प्रलंबित मागण्यांसाठी मराठा क्रांतीचा मोर्चा

अन्य प्रलंबित मागण्यांवर सरकारने तोडगा न काढल्यामुळं २६ आॅगस्ट रोजी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीनं, मुंंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मंत्रालय असा पुन्हा निर्वाणीचा मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला आहे.

प्रलंबित मागण्यांसाठी मराठा क्रांतीचा मोर्चा
SHARES
Advertisement

मागील काही महिन्यांपूर्वी झालेल्या मराठा आंदोलन काळात राज्यभरातील १३ हजार ५०० आंदोलकांवर दाखल केलेल्या गंभीर गुन्ह्यांसह सरसकट सर्वच गुन्हे मागे घेण्याच यावे. यांसह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीनं मोर्चा काढण्यात येणार आहे. मागण्यांवर सरकारनं तोडगा न काढल्यानं सोमवारी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्यावतीनं मुंंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मंत्रालय असा पुन्हा निर्वाणीचा मोर्चा सकाळी ११ वाजता काढण्यात येणार आहे. 


प्रलंबित मागण्या:

  • आंदोलन काळातील सरसकट सर्व गुन्हे मागे घ्यावे.
  • २०१४ च्या विद्यार्थ्यांना तत्काळ नियुक्त्या द्या.
  • ७२ हजार मेगा भरतीतील विद्यार्त्याना तत्काळ नियुक्त्या द्या.
  • एमपीएससीच्या विद्यार्त्यांना तत्काळ नियुक्त्या द्या.
  • सारथी प्रशिक्षण स्वस्था मराठ्यांसाठी समिती द्या.
  • आ पाटील महामंडलानच्या सुलभ कर्ज योजना तत्काळ करा.
  • शेतकऱ्यांना पीकविमा तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करा.

गुन्हे मागे घेण्याचं आश्वासन

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरातून ५८ मोर्चे आणि २ ठोक मोर्चे काढले होते. या आंदोलन काळात आंदोलकांवर भादंवि ३०७ आणि ३५३ या कलमांसह सर्व गुन्हे मागे घेण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं. मात्र, अद्याप मंत्रालयीन अधिकाऱ्यांमुळं हे गुन्हे मागे घेण्याची कार्यवाही केली जात नसल्याचं समजतं. त्यामुळं सामान्य विभागाच्या या अधिकाऱ्यांवर निलंबनाच्या कारवाईची मागणी करण्यात आली आहे.हेही वाचा -

विधानसभा निवडणुकीच्या तारखा ऑक्टोबरमध्ये होणार जाहीर?

गणेशोत्सव २०१९ : स्वराज्याची मुहर्तमेढ रोवणारा गणेश गल्लीचा राजासंबंधित विषय
Advertisement