Advertisement

विधानसभा निवडणुकीच्या तारखा ऑक्टोबरमध्ये जाहीर?


विधानसभा निवडणुकीच्या तारखा ऑक्टोबरमध्ये जाहीर?
SHARES

राज्यात होणारी आगामी विधानसभा निवडणूक ऑक्टोबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. तसंच, निवडणुकीच्या तारखांची घोषणा निवडणूक आयोग गणेशोत्सवानंतर करण्याची शक्यता वर्तवली जात असून, आचारसंहिता देखील लागू करण्यात येईल. मात्र, सर्वपक्षीय उमेदवार निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. त्याशिवाय अनेक नेते मतदारांना भेट देत समस्या जाणून घ्यायचा प्रयत्न करत आहेत

आचारसंहिताही लागू

निवडणूक आयोग विधानसभा निवडणुकीच्या तारखांची ज्या दिवशी घोषणा करतील, त्याच दिवशी आचारसंहिता लागू होणार आहे. आचारसंहिता लागू झाल्यावर राज्यातील सर्वप्रकारचे अधिकार निवडणूक आयोगाच्या हाती येणार असून, सरकारला कोणताही निर्णय घेण्याआधी निवडणूक आयोगाशी चर्चा करूनच निर्णय घ्यावा लागणार आहे.

तारीख पुढे ढकलण्याची मागणी

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी पश्चिम महाराष्ट्रात निर्माण झालेली पूरस्थिती लक्षात निवडणुकीच्या तारखा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. तसंच राज ठाकरे यांच्या मागणीला राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी पाठिंबा दिला होतात्यामुळं निवडणूक आयोग तारखा पुढे ढकलणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.



हेही वाचा -

गणेशोत्सव २०१९: गणपती बाप्पाची मिरवणूक यंदा लांबणार

बेस्टचा संप तूर्तास टळला, मात्र २६ ऑगस्ट धरणे आंदोलन



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा