Advertisement

बेस्टचा संप तूर्तास टळला, मात्र २६ ऑगस्ट धरणे आंदोलन

बेस्ट कामगारांच्या संपाबाबत मतदान झाल असून, उपक्रमातील ९८ टक्के कामगारांनी संपाच्या बाजुने कौल दिला आहे.

बेस्टचा संप तूर्तास टळला, मात्र २६ ऑगस्ट धरणे आंदोलन
SHARES
बेस्ट कामगारांच्या संपाबाबत मतदान झाल असून, उपक्रमातील ९८ टक्के कामगारांनी संपाच्या बाजुने कौल दिला आहे. प्रशासनाने नवीन वेतनश्रेणी करार करण्याची तयारी दाखविली आहे. यासाठी कामगार संघटनांबरोबर वाटाघाटी होणार असल्याने बेस्ट कृती समितीने तूर्तास संपाचा निर्णय लांबणीवर टाकला आहे. परंतु, २६ ऑगस्ट रोजी वडाळा बस आगारामध्ये कामगार धरणं आंदोलन करणार आहेत.

संपाची हाक

प्रलंबित वेतनकरार, बेस्ट अर्थसंकल्पाचे महापालिकेच्या अर्थसंकल्पात विलिनीकरण, दिवाळी बोनस अशा विविध मागण्यांसाठी कामगार संघटनांनी संपाची हाक दिली आहे. मात्र यापूर्वी दोनदा संपाचा निर्णय पुढे ढकलण्यात आला. 

बस आगारांमध्ये मतदान

या संपाला शिवसेना व काही कामगार संघटनांचा विरोध असल्याने शुक्रवारी सर्व बस आगारांमध्ये मतदान घेण्यात आले. या मतांची मोजणी शनिवारी सकाळी परळ येथील शिरोडकर हायस्कूलमध्ये करण्यात आली. या मतमोजणीत ९८ टक्के कामगारांनी संपाच्या बाजुने कौल दिला असून, बेस्ट प्रशासन आणि शिवसेना प्रणित बेस्ट कामगार सेनेमध्ये झालेल्या चर्चेनुसार २७ ऑगस्टपर्यंत वेतनकरार करणार असल्याचे जाहीर केले आहे. 

वाटाघाटी सुरु

वाटाघाटी सुरु असल्याने संप करुन त्यात अडथळा आणू नये, असे संघटनेचे मत असल्याने संपाबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही, असे कृती समितीचे नेते शशांक राव यांनी सांगितले.

बेस्ट कामगारांच्या मागण्या

  • सातवा वेतन आयोग लागू करणे.
  • बेस्टच्या अर्थसंकल्पाचे महापालिकेच्या
  • अर्थसंकल्पात विलिनीकरण.
  • दिवाळी सणानिमित्त सानुग्रह अनुदान.
Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा