कोरोना व्हायरसचा 'कोरोना बिअर' व्यवसायावर परिणाम

सध्या कोरोना व्हायरसमुळे (coronavirus) लोकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झालं आहे. आतापर्यंत चीनमध्ये अनेकांना या व्हायरसमुळे प्राण गमवावे लागले आहेत. ८ हजार पेक्षा अधिक जणांना याची लागण झाली आहे. मात्र गुगल ट्रेंडनुसार असं समोर आलं आहे की, या भयंकर आजाराला एक बिअरशी जोडलं जात आहे

गुगल ट्रेंडमधून समोर आले आहे की, लोकं कोरोना बिअर (corona beer) व्हायरस गुगलवर खूप सर्च करत आहेत. कोरोना व्हायरस आणि मॅक्सिकोचा प्रसिद्ध बिअर ब्रँड ‘कोरोना’मध्ये लोकं गोंधळून गेले आहेत. ‘कोरोना बिअर व्हायरस’ सर्च करण्यामध्ये पुर्व यूरोपमधील देश एस्टोनिया सर्वात पुढे आहे.

गुगल ट्रेंड (google trend) नुसार १८ जानेवारीनंतर युजर्स गुगलवर ‘कोरोना व्हायरस’, ‘बिअर व्हायरस’ आणि ‘बिअर कोरोना व्हायरस’ सर्च करत आहेत. यासोबत लोक या व्हायरसच्या लक्षणांबद्दल देखील सर्च करत आहे

बिअर कंपनी कोरोना एक्स्ट्राने देखील सांगितले की, त्यांना विश्वास आहे की ग्राहक त्यांच्या बिअरला जीवघेण्या कोरोना व्हायरसशी जोडणार नाही. या बिअरचा या व्हायरसशी काहीही संबंध नाही. आतापर्यंत कंपनीचं खूप मोठं नुकसान झालं आहे. अनेक ठिकाणी लोकांनी कोरोना बिअरवर बहिष्कार टाकाला आहे. 

कोरोना हे नाव सूर्याच्या वादनाशी संबंधित आहे. याचा विषाणूशी काहीही संबंध नाही. रँकिंगनुसार कोरोना बीयर अमेरिकेत तिसरा सर्वाधिक लोकप्रिय बिअर ब्रँड आहे. अमेरिकेत विकल्या जाणाऱ्या बिअर ब्रँडमध्ये गिनीज पहिला आणि हाईनकेन दुसरा आहे.


हेही वाचा

म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करताना 'या' ५ चुका टाळा

लवकरच येणार वॉर्निश केलेल्या १०० रुपयांच्या नोटा

पुढील बातमी
इतर बातम्या