Advertisement

लवकरच येणार वॉर्निश केलेल्या १०० रुपयांच्या नोटा

पाच केंद्रांमध्ये १०० रुपये किंमतीच्या एक अब्ज वॉर्निश नोट्स आणण्यास सरकारनं मान्यता दिली आहे.

लवकरच येणार वॉर्निश केलेल्या १०० रुपयांच्या नोटा
SHARES

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं प्रायोगिक चाचणी आधारावर पाच केंद्रांमध्ये १०० रुपये किंमतीच्या एक अब्ज वॉर्निश नोट्स आणण्यास सरकारनं मान्यता दिली आहे. एका प्रश्नाचं उत्तर देताना अर्थ राज्यमंत्री अनुरागसिंग ठाकूर यांनी मंगळवारी ही माहिती दिली.

अनुराग सिंग ठाकूर म्हणाले की, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं शिमला, जयपूर, भुवनेश्वर, म्हैसूर आणि कोची या पाच केंद्रांवर प्रायोगिक तत्त्वावर १०० रुपयांच्या एक अब्ज वॉर्निश नोटा सुरू करण्यास सरकारनं मान्यता दिली आहे. यामुळे बऱ्याच काळासाठी नोट्स वापरण्या योग्य राहतील.


वॉर्निश नोट म्हणजे?

वॉर्निश नोटांवर एक वेगळ्या प्रकारचा उत्कृष्ट असा थर आहे. ज्यामुळे ते अधिक टिकाऊ आणि सुरक्षित होतील. अशा नोट्स लवकर खराब होत नाहीत. नोट छापल्यानंतर त्यांना वॉर्निश केलं जात आहे. तथापि, यामुळे नोटा बनवण्यासाठी लागणारा खर्च वाढेल.


लवकर खराब होतायेत नोटा

देशातील सध्या चलनात असलेल्या नोटा लवकर खराब होत आहेत. दरवर्षी रिझर्व्ह बँकेला कोट्यवधी रुपयांच्या नोटा बदलवाव्या लागतात. सहसा दर वर्षी दर पाचपैकी एक नोट बदलावी लागते. यासाठी आरबीआयला पैसे खर्च करावे लागतात


नोटांची वॉर्निश, नाणी आणि नवीन चलन बनवणारी कंपनी पीएनओ ग्लोबल या वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, नोटा वार्निशिंगचा ट्रेंड जगात १९५८ मध्ये सुरू झाला. सर्वात प्रथम डच गिल्डर नोटांना पीपीजी पॉलिमाईड पासून बनवलेल्या वार्निशची कोटिंग केली होती. वॉर्निश केल्यामुळे या नोटा ६० वर्षांहून अधिक काळ टिकतात. 



हेही वाचा

ग्राहकांसाठी नवा गुंतवणूकीचा पर्याय, आता पेटीएम काढणार विमा

आधार-पॅन लिंक न केल्यास १० हजाराचा भुर्दंड आणि...

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा