Advertisement

आधार-पॅन लिंक न केल्यास १० हजाराचा भुर्दंड आणि...

आयकर विभागाकडून नुकताच एक अध्यादेश जारी करण्यात आला आहे. तुम्ही केलं का आधार-पॅन लिंक... नसेल तर होईल मनस्ताप...

आधार-पॅन लिंक न केल्यास १० हजाराचा भुर्दंड आणि...
SHARES

जर तुम्ही आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक केलं नसेल तर भुर्दंड भरण्यास तयार राहा. ३१ मार्चपूर्वी जर तुम्ही आधार कार्ड पॅन कार्डसोबत लिंक करू शकला नाहीत तर तुम्हांला दोन गोष्टींचा सामना करावा करणार आहे. एक म्हणजे तुमचे पॅन कार्ड इन अ‍ॅक्टिव्ह होईल. दुसरे म्हणजे तुम्हाला १० हजार रूपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो.

आयकर विभागाकडून नुकताच एक अध्यादेश जारी करण्यात आला आहे. दरम्यान एखादी व्यक्ती नव्या नोटिफिकेशननुसार इन्व्हॅलिड पॅन कार्ड वापरताना आढळल्यास आयकर कायद्याच्या कलम २७२ बी अंतर्गत संबंधित व्यक्तीला १० हजार रूपयांपर्यतचा दंड आकारला जाऊ शकतो.


आधार-पॅन लिंक न केल्यास...

दरम्यान १३ फेब्रुवारी २०२० रोजी सीबीडीटीनं अध्यादेश काढला होता. यानुसार जर ३१ मार्चपूर्वी पॅन कार्ड आधार कार्डासोबत लिंक केलेलं नसेल तर १ एप्रिल पासून ते इन अ‍ॅक्टिव्ह होणार आहे. तुमचे पॅनकार्ड इनअ‍ॅक्टिव्ह असेल तर बँकिंग व्यवहारापासून, प्रॉपर्टी विकत घेणे, विकणे अशा आर्थिक व्यवहारामध्ये, स्टॉक आणि म्युचअल फंडच्या गुंतवणूकीमध्येही अडथळे येऊ शकतात. दरम्यान कार्यान्वित नसलेले पॅनकार्ड देखील तुमच्याकडे पॅनकार्ड नसल्यासारखेच आहेत. तुम्ही आधारकार्डासोबत पॅनकार्ड लिंक केल्यानंतर ते पुन्हा अ‍ॅक्टिव्ह होऊ शकते.


'ही' आहे अंतिम मुदत

केंद्र सरकारनं या अगोदर पॅन कार्डला आधार कार्डसोबत लिंक करण्यासाठी पुरेशी मुदतवाढ दिली आहे. पण अद्यापही देशातील सुमारे १७ कोटीहून अधिक नागरिकांनी आपले पॅन कार्ड आधार कार्डसोबत लिंक न केल्यामुळे अशा लोकांसाठी ३१ मार्च २०२० ही अंतिम मुदत असेल.


पॅन-आधार कसे जोडाल

पॅन आणि आधार लिंक करण्यासाठी तुम्ही आयकर विबागच्या अधिकृत ई-फाईलिंग पोर्टलवर जाऊन हे करू शकता. या पोर्टलवर आपल्याला डावीकडील पॅन-आधार लिंक करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. (https://www1.incometaxindiaefiling.gov.in/eFilingGS/Services/LinkAadhaarHome.html). त्यावर क्लिक करण्यासाठी आपल्याला पॅन क्रमांक, आधार क्रमांक आणि आपलं नाव हे कॉलम भरावे लागेल. यानंतर आयकर विभाग आपल्याद्वारे दिलेली माहिती सत्यापित करेल. त्यानंतर लिंक करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.


आधार-पॅन जोडताना हे लक्षात ठेवा

आधार किंवा पॅन ऑनलाइन किंवा एसएमएसद्वारे लिंक करू शकता. आपला आधार पॅनशी जोडताना काही सावधगिरी बाळगणं आवश्यक आहे. आधार-पॅन लिंक करण्यासाठी आपल्या पॅन आणि आधारच्या नावामध्ये कुठलीही चुक किंवा जन्म तारीख चुकीची तर नाही हे तपासून घ्या. जर अशी परिस्थिती उद्भवली तर आपणास पॅन-आधार लिंक करण्याची प्रक्रिया रद्द करावी लागेल





संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा