Advertisement

ग्राहकांसाठी नवा गुंतवणूकीचा पर्याय, आता पेटीएम काढणार विमा

भारतामध्ये अधिकतर गुंतवणूक ही विमा कंपन्यांमध्ये केली जाते. आता विमा काढण्यासाठी आणखी एक पर्याय उपलब्ध झाला आहे.

ग्राहकांसाठी नवा गुंतवणूकीचा पर्याय, आता पेटीएम काढणार विमा
SHARES

आता विमा काढताना आणखी एक पर्याय उपलब्ध होणार आहे. विमा काढताना किंवा पैशांची गुंतवणूक करताना तज्ञांचा सल्ला घेतला जातो. विमा काढताना अधिक फायदा कोण देणार यावर नेमकी कुठे गुंतवणूक करायची हे ग्राहक ठरवत असतात. भारतामध्ये अधिकतर गुंतवणूक ही विमा कंपन्यांमध्ये केली जाते. आता विमा काढण्यासाठी पेटीएम एक नवा पर्याय घेऊन आलं आहे. ऑनलाईन व्यवहारांमध्ये ग्राहकांचा विश्वास मिळवल्यानंतर आता पेटीएम ग्राहकांसाठी नवा गुंतवणूकीचा पर्याय घेऊन आलं आहे.


४ कॅटेगरीमध्ये विमा काढणार

ऑनलाईन पेमेंट प्लॅटफॉर्म कंपनी म्हणजेचं पेटीएमची सहय्यक कंपनी पेटीएम विमा कंपनीनं इंशूरेंस रेग्यूलेटरी अ‍ॅथॉरिची ऑफ इंडिया म्हणजेच IRDAI कडून लायसन मिळवलं आहे. या लायसनमुळे कंपनी देशभरातील लाखो ग्राहकांचा विमा काढू शकणार आहे. PIBPAL ही कंपनी आत्ता टू-व्हीलर, फोर-व्हीलर आणि हेथसह जीवन विमा यासारख्या चार वेगवेगळ्या प्रकारचे विमा काढू शकणार आहे. PIBPAL कंपनीनं भारतात आधी २० मोठ्या विमा कंपन्याशी गठबंधन केलं.


. करोड पार्टनर्सना फायदा

POSPS कंपनी आपलं मोठं जाळं पसरवत आहे जे विमा प्रोडक्ट विकून फायदा उठवण्याच्या तयारीत आहे. अतिरिक्त स्त्रोत, विमा प्रोडक्टमधून मिळणारं कमिशन याच्या माध्यमातून कंपनी सशक्त बनणार आहे. यावर्षी योजनेच्या माध्यमातून २ लाख POSPS सोबत जोडली जाणार आहे.


यासाठी वित्त सेवांमध्ये सहभाग

वित्तीय सेवांमध्ये कंपनीला वाढवण्यासाठी आणि लाखो ग्राहकांना वेगवेगळ्या योजना देण्यासाठी हा प्रयत्न असल्याचं पेटीएमच्या प्रेसिडेंट अमित नैय्यर यांनी म्हटलं आहे. भारतात विमा काढणाऱ्यांची क्षमता अधिक आहे. मात्र लोकांना जास्त पर्याय उपलब्ध नसल्यानं याचा फायदा होणार असल्याचं त्यांनी म्हटल आहे. पेटीएम विमा आपल्या लाखो ग्राहकांना योग्य सेवा देणार आहे.



हेही वाचा

बिटकॉइनवरील बंदी सर्वोच्च न्यायालयाने हटवली

LIC मध्ये 'इतक्या' पदांसाठी भरती

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा