Advertisement

बिटकॉइनवरील बंदी सर्वोच्च न्यायालयाने हटवली

भारतात आता बिटकॉइनचे (Bitcoin) व्यवहार करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) बुधवारी क्रिप्टोकरन्सी (crypto currency) या आभासी चलनांवरील बंदी उठवली आहे.

बिटकॉइनवरील बंदी सर्वोच्च न्यायालयाने हटवली
SHARES

भारतात आता बिटकॉइनचे (Bitcoin) व्यवहार करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) बुधवारी क्रिप्टोकरन्सी (crypto currency) या आभासी चलनांवरील बंदी उठवली आहे. २०१८ मध्ये रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank of India) बिटकॉइनसहीत अनेक क्रिप्टोकरन्सीवर बंदी घातली होती. आभासी चलनाबाबत नियमावली नसल्याने रिझर्व्ह बँकेने हे पाऊल उचललं होतं. 

इंटरनेट आणि मोबाइल असोसिएशन ऑफ इंडिया या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयाने २८ जानेवारी रोजी या खटल्याची सुनावणी घेऊन निर्णय राखून ठेवला होता. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रोहिंग्टन फली नरिमन, न्यायमूर्ती आर. रवींद्र भट्ट, न्यायमूर्ती व्ही. सुब्रह्मण्यन यांच्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने क्रिप्टोकरन्सीच्या वापरावरील रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) ने घातलेली बंदी बुधवारी उठवली आहे. आता ग्राहकांना देशातील सर्व बँकांमध्ये त्याद्वारे व्यवहार करता येणार आहे. 

बिटकॉइनपासून (Bitcoin) सुरू झालेले आभासी चलनाचे व्यवहार लाइटकॉइन, रिपल, इथेरिअम, डॉजकॉइन, कॉइन्ये, नेम, डॅश, मोनेरो, ब्लॅककॉइन अशा अनेक आभासी चलनांमध्ये सध्या होत आहेत. या सर्वांमध्ये लोकप्रिय आभासी चलन म्हणून बिटकॉइन प्रसिद्ध आहे. सध्या जागतिक बाजारात बिटकॉइन्सचा भाव ८८१५ डॉलर आहे. बिटकॉइन्सची एकूण बाजारपेठ १६१ अब्ज डॉलरची आहे. बिटकॉईन हे रुपया, डॉलर किंवा इतर कुठल्याही चलनाप्रमाणे एक चलन असतं. फक्त ते ऑनलाईन असतं आणि एका काॅम्प्युटर कोडद्वारे एनक्रिप्टेड म्हणजे लॉक केलेलं असतं. जशा आपल्याला बँकांमधून नोटा मिळतात तसंच इथंही ऑनलाईन साइट्सवर हे चलन तुम्हाला तुमच्याकडच्या पैशातून खरेदी करता येतं.हेही वाचा -

आधार-पॅन लिंक न केल्यास १० हजाराचा भुर्दंड आणि...

५ लाख गुंतवणुकीवर मिळतील ७.२५ लाख, 'अशी' आहे पोस्टाची स्कीम
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा