Advertisement

५ लाख गुंतवणुकीवर मिळतील ७.२५ लाख, 'अशी' आहे पोस्टाची स्कीम

एखाद्या गुंतवणूकदाराने ५ वर्षांच्या कालावधीसाठी पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट योजनेत ५ लाख रुपये जमा केले तर त्याला वार्षिक ७.७ टक्के चक्रवाढ दराने व्याज मिळेल.

५ लाख गुंतवणुकीवर मिळतील ७.२५ लाख, 'अशी' आहे पोस्टाची स्कीम
SHARES

एसबीआयसह सर्व बँका त्यांचे ठेवींवर दर (एफडी) सातत्याने कमी करीत आहेत. एसबीआयमध्ये ७ दिवस ते ५ वर्षांच्या एफडीवर दरवर्षी जास्तीत जास्त ६.३० टक्के दराने व्याज मिळते. एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक आणि बँक ऑफ बडोदासह सर्व प्रमुख सरकारी आणि खासगी बँकांचाही फडीवर वार्षिक व्याजदर ( interest rates) हाच आहे.  अशा परिस्थितीत बँक एफडीपेक्षा चांगला पर्याय म्हणजे पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट ( Post Office Time Deposit - पीओटीडी).  यामध्ये १ वर्षापासून ५ वर्षाच्या ठेवींवर (deposite) वार्षिक ७.७ टक्के व्याज मिळते.


१ वर्ष ते ५ वर्षांच्या ठेवींवर व्याज

मुदत         व्याज दर

१ वर्ष         ६.९ %

२ वर्षे         ६.९ % 

३ वर्षे         ६.९ %

५ वर्षे        ७.७ %


५ लाखांच्या ठेवींवर २.२ लाख परतावा

जर एखाद्या गुंतवणूकदाराने ५ वर्षांच्या कालावधीसाठी  पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट योजनेत ५ लाख रुपये जमा केले तर त्याला वार्षिक ७.७ टक्के चक्रवाढ दराने व्याज मिळेल. ही रक्कम ५ वर्षांनंतर ७ लाख २४ हजार ५१७ रुपये होईल. म्हणजेच या ठेवीवरील व्याज २.२४ लाख रुपये असेल. ३ वर्षांच्या ठेवींवर ६.१० लाख रुपये, २ वर्षांच्या ठेवीवर ५ लाख ७१ हजार ३८१ रुपये आणि १ वर्षाच्या ठेवीवर ५ लाख ३४ हजार ५०० रुपये मिळतील. 


व्याज बचत खात्यातही

आपल्याला दरवर्षी व्याजासाठी जायचे नसल्यास आपण पोस्ट ऑफिसला सूचना देऊ शकता की वार्षिक व्याज आपल्या पोस्ट ऑफिसच्या बचत खात्यात हस्तांतरित करा. याचा फायदा म्हणजे येथे ठेवींवरही तुम्हाला वार्षिक ४  टक्के दराने व्याज मिळेल. ही सुविधा २, ३ किंवा ५ वर्षांच्या पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट  योजनेत मिळते.


योजनेची वैशिष्ट्ये

  •  बँकांमधील ५ लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींवर सुरक्षेची हमी आहे. मात्र, पोस्टातील १०० टक्के गुंतवणुकीवर सुरक्षेची हमी मिळते. हा या योजनेचा सर्वात मोठा फायदा आहे. 
  • पोस्ट ऑफिसमध्ये किमान १००० रुपयांसह टाइम डिपॉझिट खाते उघडता येते. जास्तीत जास्त रक्कम जमा करण्याची मर्यादा नाही.
  • यात एकल आणि संयुक्त खात्याची सुविधा आहे. वय जर १० वर्षांपेक्षा जास्त असेल तर अल्पवयीन मुलगा किंवा मुलीच्या नावेही खाते उघडले जाते.
  • या योजनेंतर्गत हवी तेवढी खाती उघडता येतात. मुदतीआधीच आपत्कालीन परिस्थितीत आपल्याला ठेव परत मिळू शकते.
  • या योजनेत ५ वर्षांसाठी केलेली गुंतवणुकीवर कर आकारला जात नाही.  प्राप्तिकर अधिनियम १९६१ च्या कलम ८० सी अंतर्गत कर सूट मिळू शकते.
  • खाते उघडताना किंवा नंतर नामांकन सुविधा उपलब्ध आहे



हेही वाचा -

Car Loan घ्यायचंय? मग जाणून घ्या बँकांचे व्याजदर

E-PAN Card मिळवा १० मिनिटात, 'अशी' आहे प्रक्रिया




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा