एसबीआयकडून ठेवींवरील व्याजदरात 'इतकी' कपात

स्टेट बँक अाॅफ इंडियाने (एसबीआय) ठेवींवरील व्याजदरात कपात करून ठेवीदारांना झटका दिला आहे. त्यामुळे ठेवींदारांना आता ठेवींवर कमी व्याज मिळेल. एसबीआयने बुधवारी ठेवींवरील व्याजदरात ०.४० टक्क्याची कपात करण्याची घोषणा केली.  बँकेच्या कोट्यवधी ठेवीदारांना याचा फटका बसणार आहे. नवीन व्याजदर 27 मे पासून लागू झाले आहेत.

एसबीआयने ७ ते ४५ दिवसांसाठीच्या ठेवींवरील व्याजदरात ०.४० टक्के कपात करून तो २.९ टक्के केला आहे. १ वर्ष ते २ वर्ष कालावधीच्या मुदत ठेवीवर आता ठेवीदारांना ५. १ टक्के व्याज मिळेल. तर ३ वर्ष ते ५ वर्ष मुदतीच्या ठेवीवर ५.३ टक्के तर ५ वर्षांहून अधिक आणि १ वर्षांहून कमी कालावधीच्या ठेवींवर ५.४ टक्के व्याज मिळेल. याआधी १२ मे रोजी एसबीआयने तीन वर्ष मुदतीपर्यंतच्या ठेवींवरील व्याजदर ०.२० टक्क्याने कमी केला होता.

एसबीआयने ज्येष्ठ नागरिकांच्या ठेवींवरील व्याजदरातही कपात केली आहे. ७ ते ४५ दिवसांसाठीच्या ठेवींवरील व्याजदरात ०.४० टक्का कपात करून तो ३. ४ टक्के केला आहे. यापूर्वी तो ३.८ टक्के होता. एक वर्ष किंवा त्याहून अधिक कालावधीसाठीच्या ठेवींवरील व्याजदरात ०.४० टक्के कपात करून तो ५.६ टक्के केला आहे. यापूर्वी तो ६ टक्के होता. ५ ते १० वर्ष मुदतीसाठी ज्येष्ठ नागरिकांचा ठेवीदर ६.२ टक्के झाला आहे. याआधी तो ६.५ टक्के होता. 


हेही वाचा -

अनिल अंबानी दिवाळखोरीत, रिलायन्स इन्फ्रा विकायला काढली

रिलायन्स जिओमध्ये गुंतवणूक सुरूच, 'या' कंपनीने 'केली' इतकी गुंतवणूक


पुढील बातमी
इतर बातम्या