Advertisement

रिलायन्स जिओमध्ये गुंतवणूक सुरूच, 'या' कंपनीने 'केली' इतकी गुंतवणूक

रिलायन्स जिओमध्ये आता आणखी एका मोठ्या कंपनीने गुंतवणूक केली आहे. एका महिन्यात जिओमध्ये गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांची संख्या पाच झाली आहे.

रिलायन्स जिओमध्ये गुंतवणूक सुरूच, 'या' कंपनीने 'केली' इतकी गुंतवणूक
SHARES

रिलायन्स जिओमध्ये आता आणखी एका मोठ्या कंपनीने गुंतवणूक केली आहे. एका महिन्यात जिओमध्ये गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांची संख्या पाच झाली आहे.  केकेआर या कंपनीने जियोमध्ये 11 हजार 367 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. केकेआर जिओमधील 2.32 टक्के शेअर्स खरेदी करणार आहे.

 आतापर्यंत जिओमध्ये पाच मोठ्या गुंतवणूकदारांनी 78 हजार 562 कोटी रुपयांची गुंतवणूक केली. फेसबुकपाठोपाठ सिल्व्हर लेक, व्हिस्टा इक्विटी पार्टनर्स, जनरल अॅटालांटिक आणि केकेआर'या कंपन्यांनी गुंतवणूक केली आहे. आशिया खंडातील केकेआरची ही सर्वात मोठी गुंतवणूक आहे.

1976 मध्ये सुरु झालेल्या केकेआरला जागतिक खाजगी उद्योगांमध्ये गुंतवणूकीचा दीर्घ अनुभव आहे. खाजगी इक्विटी आणि तंत्रज्ञान वाढीच्या निधीतून केकेआरने बीएमसी सॉफ्टवेअर, बाईटडन्स आणि गोजेक यासह अनेक तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये यशस्वीरित्या गुंतवणूक केली आहे. टेक कंपन्यांमध्ये या कंपनीने 30 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त गुंतवणूक केली आहे. तंत्रज्ञान, मीडिया आणि दूरसंचार क्षेत्रातील 20 पेक्षा जास्त कंपन्या या 'केकेआर'च्या टेक पोर्टफोलिओमध्ये आहेत. एका महिन्यात रिलायन्स जिओमध्ये 5 मोठ्या गुंतवणुकदारांनी गुंतवणूक केली आहे.

सर्वप्रथम फेसबुकनं  43 हजार 574 कोटी रूपयांची गुंतवणूक करत 9.99 टक्के हिस्सा खरेदी केला. त्यानंतर टेक इन्व्हेस्टर कंपनी सिल्व्हरलेकनं 5665.75 कोटी रूपयांच्या गुंतवणुकीसह जिओमधील 1.15 टक्के हिस्सा खरेदी करणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर विस्टा इक्विटी पार्टनर्सनं जिओमधील २.३२ टक्के हिस्सा खरेदी करत ११,३६७ कोटी रूपयांची गुंतवणूक केली. जिओमध्ये गुंतवणूक करणाऱ्या या  कंपन्या त्यांच्या सेक्टरमधील दिग्गज कंपन्या आहेत.


हेही वाचा -

घरबसल्या विकत घेता येणार महिंद्राच्या गाड्या

नोकरी जाण्याची भीती आहे? मग 'ही' योजना ठरू शकते वरदान

 




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा