Advertisement

नोकरी जाण्याची भीती आहे? मग 'ही' योजना ठरू शकते वरदान

नोकरी जाण्याची भिती असलेल्यांसाठी एक चांगली बातमी आहे.

नोकरी जाण्याची भीती आहे? मग 'ही' योजना ठरू शकते वरदान
SHARES

कोरोना व्हायरस (Coronavirus)च्या संकटामुळे देशाची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. या काळात होणाऱ्या नुकसानामुळे अनेक कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांमध्ये कपात करण्यास सुरूवात केली आहे. या संकटाच्या काळात जवळपास सर्वच क्षेत्रात लोकांच्या नोकऱ्या जाण्याची भीती आहे. नोकरी जाण्याची भिती असलेल्यांसाठी एक चांगली बातमी आहे.

केंद्र सरकारनं एक योजना आणली आहे. या योजनेनुसार बरोजगार झाल्यास २४ महिन्यांसाठी तुम्हाला पैसे मिळतील. नेमकं या योजनेसाठी कशी नोंदणी कराल हे जाणून घ्या.


२ वर्षांपर्यंत आर्थिक मदत

मोदी सरकारच्या या योजनेचं नाव 'अटल बीमित व्यक्ती कल्याण' योजना असं आहे. या योजनेअंतर्गत तुम्हाला मिळणारा फायदा असा आहे की, नोकरी गेल्यास सरकार तुम्हाला आर्थिक मदत करेल. ही आर्थिक मदत प्रत्येक महिन्याला मिळेल. मागील ९० दिवसांच्या सरासरी उत्पन्नाच्या २५ टक्के रक्कम बेरोजगार व्यक्तीला मिळेल. या योजनेचा लाभ संघटित क्षेत्रातील तेच व्यक्ती उचलू शकतात ज्यांना ESIC विमा मिळतो आहे आणि दोन वर्षांपेक्षा कमी काळ ज्यांनी नोकरी केली आहे. त्याशिवार डेटा बेसशी आधार आणि बँक डिटेल्स संलग्न असणं गरजेचं आहे.


अशी करा नोंदणी

जर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ इच्छिता तर तुम्हाला ESIC च्या वेबसाइटवर जाऊन अटल बीमित व्यक्ती कल्याण योजनेसाठी नोंदणी करावी लागेल. https://www.esic.nic.in/attachments/circularfile/93e904d2e3084d65fdf7793e9098d125.pdf या लिंकवर तुम्हाला सविस्तर माहिती मिळू शकते.


'यांना' लाभ मिळणार नाही

चुकीच्या वर्तणुकीमुळे कंपनीतून काढून टाकले असल्यास त्या व्यक्तींना या योजनेचा लाभ मिळणार नाही. त्याशिवाय फौजदारी खटला दाखल झाला असल्यास किंवा कर्मचाऱ्याने स्वेच्छानिवृती (VRS) घेतली असल्यास अशा व्यक्तींना देखील या योजनेचा लाभ मिळणार नाही.




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा