एसबीआयकडून गृहकर्जाच्या व्याजदरात कपात

स्टेट बँक आॅ इंडिया (एसबीआय) ने आपल्या ग्राहकांना दिवाळी भेट दिली आहे. एसबीआयने गृहकर्जावरील व्याजदरात ०.२५ टक्के कपात केली आहे. तसंच गृहकर्जाचे प्रक्रिया शुल्क देखील माफ केलं आहे. 

एसबीआयच्या ग्राहकांना ७५  लाख रुपयांपर्यंतच्या घर खरेदीवर ०.२५ टक्के व्याज सवलत मिळणार आहे. ही सूट सीबीलच्या स्कोअरवर आधारित असेल आणि योनो अॅपद्वारे अर्जावर उपलब्ध असेल, अशी माहिती बँकेकडून देण्यात आली आहे.

एसबीआयमध्ये सध्या गृहकर्जाचा व्याजदर ६.९० टक्के आहे. हा व्याज दर ३० लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर लागू होतो. बँकेन नवीन कर्जदारांनी प्रक्रिया शुल्क १०० टक्के माफ केले आहे. योनो अॅपवरून गृहकर्जासाठी अर्ज केल्यावर खास सवलती मिळणार आहेत.


हेही वाचा -

भारत बायोटेकच्या 'कोव्हॅक्सिन' लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू

स्मारक की मातोश्री तीन??, मनसेचा खोचक प्रश्न


पुढील बातमी
इतर बातम्या