Advertisement

भारत बायोटेकच्या 'कोव्हॅक्सिन' लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू

भारत बायोटेकची कोरोनावरील 'कोव्हॅक्सिन' लसची तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरूवात झाली आहे.

भारत बायोटेकच्या 'कोव्हॅक्सिन' लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू
SHARES

भारत बायोटेकची कोरोनावरील 'कोव्हॅक्सिन' लसची तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरूवात झाली आहे. या कंपनीनं कोविड-१९ वरील लसीसाठी आयसीएमआर सोबत भागिदारी केली आहे. भारत बायोटेक ही जगातील एकमात्र लसनिर्माती कंपनी असून, जिच्याकडे जैव सुरक्षा स्तर-३ (बीएसएल३) उत्पादनाची सुविधा आहे.

मागील महिन्यात कंपनीनं पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील परीक्षणाचं अंतरिम विश्लेषण यशस्वीपणे पूर्ण केलं आहे. आता कंपनी २६ हजार स्वयंसेवकांवर तिसऱ्या टप्प्यातील परीक्षण सुरू करणार आहे. याबाबत कंपनीने वेबसाईटवर एक लिंक शेअर केली आहे. भारत बायोटेक कंपनीनं २ ऑक्टोबर रोजी भारतीय औषधी महानियंत्रक (डीसीजीआय) यांच्याकडं लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील परीक्षणासाठी परवानगी मागितली होती.

ही कंपनी कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी एक अजून लस विकसित करत आहे. ही लस नाकाच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या ड्रॉपच्या रूपात असणार आहे. ही लस पुढील वर्षापर्यंत तयार होणार आहे. अमेरिकन औषधनिर्माता कंपनी मॉडर्नानं त्यांनी विकसित केलेली कोरोनावरील लस ९४.५ टक्के प्रभावी असल्याचा दावा केला आहे. लेट स्टेज क्लिनिकल ट्रायलच्या सुरुवातीच्या डेटाच्या आधारावर कंपनीनं हा दावा केला आहे. एका आठवड्याच्या आत लसीबाबत सकारात्मक माहिती देणारी मॉडर्ना दुसरी अमेरिकन कंपनी आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा