Advertisement

स्मारक की मातोश्री तीन??, मनसेचा खोचक प्रश्न

मागील ३ वर्षांपासून अत्यंत धिम्या गतीने सुरू असलेल्या शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या कामावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी टीका केली आहे.

स्मारक की मातोश्री तीन??, मनसेचा खोचक प्रश्न
SHARES

मागील ३ वर्षांपासून अत्यंत धिम्या गतीने सुरू असलेल्या शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या कामावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी टीका केली आहे. या टीकेनंतर सोशल मीडियावर काही जणांनी नाराजी देखील व्यक्त केली आहे.  

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आदरांजली वाहण्यासाठी राज्यभरातून शिवसैनिक छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील स्मृतिस्थळावर दाखल हाेत आहेत. शिवतीर्थावर आदरांजली वाहिल्यानंतर आपासूकच त्यांची पावलं जवळच असलेल्या स्मारकाच्या ठिकाणाकडे वळत आहेत. परंतु या ठिकाणाचा चोहोबाजूंनी बंदिस्त करून आतमध्येच कोणालाचं सोडलं जात नसल्याने शिवसैनिकांना माघारी फिरावं लागत आहे.

यावरून टीका करताना संदीप देशपांडे (sandeep deshpande) यांनी स्मारक की मातोश्री तीन?? असा पश्न उपस्थित करत एकप्रकारे शिवसेना आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

हेही वाचा- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन; आदरांजली वाहण्यासाठी शिवसैनिक शिवतीर्थावर

एका वृत्तवाहिनीशी बोलताना संदीप देशपांडे म्हणाले, स्मारकाच्या कामासाठी महापौर बंगला घेऊन आता ३ वर्षे होत आली. परंतू हा बंगला अजूनही बंदीस्तच आहे. २३ जानेवारी किंवा १७ नोव्हेंबर या तारखा जवळ आल्यावर स्मारकाच्या कामासाठी निविदा काढल्यात, काम सुरू आहे, इतक्याच बातम्या आम्हाला पाहायला मिळतात. 

खरोखर ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक असेल तर ते बंदीस्त का आहे. ते जनेसाठी का खुलं नाही? जनतेला त्या ठिकाणी का जाता येत नाही?, कोणाची खासगी मालमत्ता असल्यासारखं ते का वापरलं जातंय?,” असे प्रश्न जनतेच्या मनात निर्माण होत आहेत.

हेच प्रश्न मी देखील उपस्थित करत असल्याचं (mns) संदीप देशपांडे यांनी सांगितलं. तर बाळासाहेबांच्या स्मारकाला तरी टीकेसाठी वापरू नका. फक्त टीकेसाठी टीका, पण ती करताना थोडं भान राखा. खासकरून आजच्या दिवशी तरी कोणीही मराठी माणूसच काय पण मनसेचा सामान्य कार्यकर्ताही इतक्या हिन दर्जाचं ट्विट करु शकणार नाही, अशा शब्दांत संदीप देशपांडे यांच्या ट्विटवर नेटकऱ्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

(mns leader sandeep deshpande criticised shiv sena and bmc for delaying bal thackeray memorial at dadar)

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा