Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
53,44,063
Recovered:
47,67,053
Deaths:
80,512
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
36,674
1,447
Maharashtra
4,94,032
34,848

बाळासाहेबांचं ‘ते’ स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार करू- अजित पवार

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बाळासाहेबांचं स्वप्न साकार करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

बाळासाहेबांचं ‘ते’ स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार करू- अजित पवार
SHARES

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आदरांजली वाहण्यासाठी राज्यभरातून शिवसैनिक छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील स्मृतिस्थळावर दाखल हाेत आहेत. त्याचसोबत सत्ताधारी महाविकास आघाडीतील नेत्यांकडून देखील आदरांजली वाहण्यात येत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बाळासाहेबांचं स्वप्न साकार करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

'महाराष्ट्राच्या महान नेतृत्वास माझी विनम्र आदरांजली. दिवंगत बाळासाहेबांनी त्यांच्या नेतृत्व, कर्तृत्व, वक्तृत्वाच्या बळावर मराठी मनावर कायम अधिराज्य केलं. महाराष्ट्राची अस्मिता, मराठी माणसाचा सन्मान व सामान्य जनतेच्या न्याय्य हक्कांसाठी जीवनभर संघर्ष केला. महाराष्ट्राची सर्वांगीण प्रगती आणि बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना हे बाळासाहेबांचं स्वप्न होतं. बाळासाहेबांचं हे स्वप्न पूर्ण करण्याचा आपण निर्धार करुया,' अशा शब्दांत अजित पवार यांनी बाळासाहेबांना आदरांजली वाहिली आहे.

दरवर्षी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहण्यासाठी शिवतीर्थावर लाखो शिवसैनिकांचा जनसागर उसळतो. यंदा मात्र कोरोनाचं संकट मुंबईसह देशभरावर आहे. त्यामुळं आहात तिथूनच शिवसेनाप्रमुखांना मानवंदना द्या, असं आवाहन शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. 

अनेकांना कोरोनामुळं स्मृतिस्थळावर येणं अशक्य असल्यानं आपल्या लाडक्या 'साहेबां'ना प्रत्येक शिवसैनिक, शिवसेनाप्रेमी घरातून, कार्यालयातून आणि मनामनातून 'जय महाराष्ट्र'अशी साद घालत मानवंदना देत आहे.

(maharashtra deputy cm ajit pawar pays tribute to late bal thackeray)


हेही वाचा- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन; आदरांजली वाहण्यासाठी शिवसैनिक शिवतीर्थावर


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा