Advertisement

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन; आदरांजली वाहण्यासाठी शिवसैनिक शिवतीर्थावर

शिवसैनिकांनी शिवाजी पार्क येथील स्मृतिस्थळावरही येण्यास सुरुवात केली आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन; आदरांजली वाहण्यासाठी शिवसैनिक शिवतीर्थावर
SHARES

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मंगळवारी स्मृतिदिन आहे. या स्मृतिदिनानिमित्त राज्यभरातील शिवसैनिक त्यांना आदरांजली वाहिली जात आहे. शिवाय, शिवसैनिकांनी शिवाजी पार्क येथील स्मृतिस्थळावरही येण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सकाळी ११.३० वाजता सहकुटुंब शिवाजी पार्कवर जाऊन बाळासाहेबांना आदरांजली वाहणार आहेत.

दरवर्षी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करण्यासाठी शिवतीर्थावर लाखो शिवसैनिक आणि शिवसेनाप्रेमींचा जनसागर उसळतो. यंदा मात्र कोरोनाचं संकट मुंबईसह देशभरावर आहे. त्यामुळं आहात तेथूनच शिवसेनाप्रमुखांना मानवंदना द्या, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. 

अनेकांना कोरोनामुळं स्मृतिस्थळावर येणं अशक्य असल्यानं आपल्या लाडक्या 'साहेबां'ना प्रत्येक शिवसैनिक, शिवसेनाप्रेमी घरातून, कार्यालयातून आणि मनामनातून 'जय महाराष्ट्र'अशी साद घालत मानवंदना देत आहेत.

राजकारणावर फक्त एकाच माणसाचा प्रभाव

'सन १९६९ ते २०१२ पर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणावर फक्त एकाच माणसाचा प्रभाव होता. १९९१ ते २०१२ पर्यंत देशातील हिंदू समाजाचे भवितव्य केवळ एका व्यक्तीच्या हाती होते. ती व्यक्ती म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे. आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी मराठी मन तर जपलेच होते, पण त्याचवेळी देशात हिंदुत्वाचा वन्हीदेखील चेतविला होता', अशी भावना सामनाच्या अग्रलेखातून व्यक्त करण्यात आली आहे.

'शिवसेनाप्रमुखांचा जीवनप्रवास झंझावाती होता. त्यामुळे कित्येकांना छत्रपती शिवाजी महाराजांशी त्यांची तुलना करण्याचा मोह झाला. कुणी त्यांची तुलना रणझुंजार बाजी तर कुणी त्यांची तुलना लोकमान्य टिळकांशी केली. ते काहीही असेल, पण बाळासाहेब हे सदैव सेनापतीच राहिले. लोकनायकाने सेनापतीपदी विराजमान होणे हा दुर्मिळ योग बाळासाहेबांच्या बाबतीत घडला. बाळासाहेबांनी समाजातील प्रत्येक घटकाचे नेतृत्व स्वीकारले', अशी भावनाही व्यक्त करण्यात आली आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा