एसबीआयकडून पुन्हा व्याजदरात वाढ, जाणून घ्या नवे व्याजदर

एसबीआयकडून (State Bank of India SBI) दुसऱ्यांदा व्याजदर वाढवण्यात आलेत. 10 बेसिक पॉईन्टने एसबीआयनं व्याजदरात वाढ केली आहे. व्याजदरातील ही वाढ मार्जिनल कॉस्ट आणि लँन्डिंग रेस्टवर लागू असणार आहे. नवे दर तत्काळ लागूदेखील करण्यात आलेत.

एप्रिल महिन्यात एसबीआय बँकेनं एमसीएलआरमध्ये वाढ केली होती. एप्रिलमध्ये रिझर्व्ह बँकेच्या मॉनिटरी पॉलिसी कमिटीची बैठक पार पडली होती. तेव्हा देखील एमसीएलआर मध्ये 10 बेसिक पॉईन्टची वाढ करण्यात आली होती. मॉनिटरी पॉलिसी बैठकीत रेपो रेटमध्ये 40 बेसिक पॉईट्स वाढवून 4.4 टक्के इतका करण्यात आला होता.

स्टेट बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या माहितीनुसार, आता किमान व्याजदर हा 6.85 टक्के तर कमाल व्याजदर हा 7.5 टक्के असणार आहे. ओव्हरनाईट लोनसाठी एमसीएलआर 6.75 टक्क्यांनी वाढून 6.85 टक्के करण्यात आला आहे. एका महिन्यासाठी एमसीएलआर आता 6.85 टक्के, तीन महिन्यांसाठी 6.85 टक्के, सहा महिन्यांसाठी 7.15 टक्के, एका वर्षासाठी 7.20 टक्के, दोन वर्षांसाठी 7.40 टक्के आणि तीन वर्षांसाठी 7.50 टक्के करण्यात आला आहे.

मार्जिनल कॉस्ट ऑफ लॅन्डिंग म्हणजे तो व्याजदर, ज्यापेक्षा कमी दरात कर्ज मंजूर केलं जात नाही. ऑक्टोबर 2019च्या आधी घेण्यात आलेल्या लोनसाठी ही एक प्रकारची मर्यादा ठरवण्यात आलेली आहे. बिझनेस लोहनसह हम लोन दोघांनाही हे व्याजदर लाहू आहेत. याआधी लोन घेतलेल्यांचे एएमआय आता वाढवण्यात आलेल्या व्याजदरामुळे वाढणार आहेत.


हेही वाचा

गृह, वाहन कर्ज महागणार, EMI मध्ये मोठी वाढ

CNG, PNG आणि पाईप स्वयंपाकाच्या गॅसचे दर पुन्हा वाढले

पुढील बातमी
इतर बातम्या