Advertisement

गृह, वाहन कर्ज महागणार, EMI मध्ये मोठी वाढ

आरबीआयने आपल्या रेपो रेट दरात वाढ केली आहे.

गृह, वाहन कर्ज महागणार, EMI मध्ये मोठी वाढ
SHARES

आरबीआयने आपल्या रेपो रेट दरात वाढ केली आहे. आरबीआयनं (RBI) रेपो रेट ४ टक्क्यावरून ४.४० टक्के केला आहे. रिझर्व्ह बँकेनं (Reserve Bank) रेपो रेट वाढवल्याने आता सामान्यांचं ईएमआयही वाढणार आहे. घर आणि कारच्या कर्जाचा ईएमआयही (EMI) वाढणार आहे.

देशवासीयांना महागाईचा झटका निश्चित बसणार आहे. आरबीआयनं रेपो रेट-सीआरआर वाढवला. त्यामुळं आता घर, कारचा EMI वाढणार आहे. खूप दिवसांनंतर रिझर्व्ह बँकेनं रेपो दर वाढवण्याच निर्णय घेतला.

गेल्या कित्तेक दिवसांपासून रेपो दर ४ टक्के होता. त्यात आता वाढ होणाराय. महागाई वाढत असल्यानं रिझर्व्ह बँकेवर व्याजदर वाढविण्यासाठी दबाव होता. खूप दिवसांनंतर बुधवारी अचानक रेपो रेट दर वाढवण्याचं जाहीर करण्यात आलंय.

आता रेपो रेट ४ टक्क्यांवरून वाढून ४.४० टक्के झालाय. रेपो रेट-सीआरआर वाढविण्याचा निर्णय आरबीआयचे गव्हर्नर शशिकांत दास यांनी जाहीर केला.

रेपो रेट वाढणे याचा अर्थ बँकांना मिळणाऱ्या कर्जदरातही वाढ होणार आहे. आरबीआयनं रेपो दर वाढवल्यामुळं इतर बँकांना ग्राहकांना द्यावयाचे कर्जाचे दर वाढवावे लागतील. याचा फटका बँकेकडून घरासाठी कर्ज घेणारे, कारसाठी कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना बसेल.हेही वाचा

CNG, PNG आणि पाईप स्वयंपाकाच्या गॅसचे दर पुन्हा वाढले

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा