SBIच्या 'या' सेवा ४ आणि ५ सप्टेंबरला बंद, ग्राहकांसाठी अलर्ट जारी

स्टेट बँक ऑफ इंडियानं (SBI) आपल्या ग्राहकांसाठी अलर्ट जारी केला आहे. या अलर्टनुसार, ४ आणि ५ सप्टेंबर रोजी स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या काही सेवा प्रभावित होणार आहेत. यामध्ये SBI इंटरनेट बँकिंग, UPI, YONO, YONO Business, YONO Lite, IMPS सारख्या सेवांचा समावेश आहे.

विशेष म्हणजे एसबीआयनं जारी केलेल्या वेळेपर्यंत या सेवा काम करणार नाहीयेत. एसबीआयनं सोशल मीडिया हँडल ट्विटवरुन ही माहिती दिली आहे. त्यामुळे तुम्ही जर एसबीआयचे ग्राहक असाल तर आजच आपले काम करुन घ्या, नाहीतर तुम्हाला या सेवा सुरू होईपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

एसबीआय बँकेनं म्हटलं आहे की, "४ सप्टेंबर रोजी रात्री १०.३५ ते ५ सप्टेंबर रोजी रात्री १.३५ वाजेपर्यंत (३ तास) मेंटेनन्स अॅक्टिव्हिटीचे काम केले जाणार आहे. यामध्ये इंटरनेट बँकिंग, YONO, YONO Business, YONO Lite, IMPS, UPI सेवा या कालावधीत बंद राहतील. एसबीआयनं पुढे म्हटले की, आमच्याकडून होणाऱ्या त्रासाबद्दल क्षमस्व तुम्ही आम्हाला सहकार्य कराल ही विनंती.

एसबीआयने गृह, वैयक्तिक, कार आणि सुवर्ण कर्जावर प्रक्रिया शुल्क न आकारण्याचा निर्णय घेतला आहे. या व्यतिरिक्त, तुम्हाला कर्ज घेण्यावरही विशेष सवलत दिली जाणार आहे. एसबीआयनं गोल्ड लोनवर 0.50% आणि कार लोनवर 0.25% सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. कार लोनचा लाभ घेण्यासाठी अर्ज प्रक्रिया योनो एसबीआयवरुन करावी लागेल.


हेही वाचा

बीपीसीएल खरेदी करण्यासाठी परदेशी कंपन्या इच्छुक

महागाईचा फटका, घरगुती LPG सिलिंडर २५ रुपयांनी महागला

पुढील बातमी
इतर बातम्या