Advertisement

बीपीसीएल खरेदी करण्यासाठी परदेशी कंपन्या इच्छुक

बीपीसीएल ही भारतातील तिसरी सर्वात मोठी तेल कंपनी आहे. केंद्र सरकार बीपीसीएलमधील आपली सर्व हिस्सेदारी विकणार आहे.

बीपीसीएल खरेदी करण्यासाठी परदेशी कंपन्या इच्छुक
SHARES

भारताची दिग्गज तेल कंपनी भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) लखरेदी करण्यासाठी परदेशी कंपन्या इच्छुक आहेत.  बीपीसीएल खरेदी करण्याच्या शर्यतीत जगातील मोठ्या कंपन्या सहभागी झाल्या आहेत. उद्योगपती अनिल अग्रवाल यांचा वेदांत समूह, अमेरिकेतील अपोलो ग्लोबल आणि आय स्क्वेयर्ड कॅपिटल या गुंतवणूक कंपन्यांनी उत्सुकता दाखवली आहे.

बीपीसीएल ही भारतातील तिसरी सर्वात मोठी तेल कंपनी आहे. केंद्र सरकार बीपीसीएलमधील आपली सर्व हिस्सेदारी विकणार आहे. सरकारची या कंपनीत ५२.९८ टक्के भागीदारी आहे. बीपीसीएल खरेदी करण्यासाठी गेल्यावर्षी वेदांता आणि अमेरिकेतील दोन गुंतवणूक कंपन्यांनी बोली लावली होती. 

बीपीसीएल खरेदी करण्याच्या बोलीत सहभागी होण्यासाठी इतर कंपन्या आणि गुंतवणूकदारांनाही संधी दिली जाणार आहे. ते वैयक्तिक किंवा भागीदारीत बोली लावू शकतात. गेल्यावर्षी रशियातील तेल कंपनीने बीपीसीएल खरेदी करण्यासाठी स्वारस्य दाखवले होते. मात्र नंतर या कंपनीकडून काहीच हालचाल झाली नाही. याशिवाय रॉयल डच सेल, बीपी आणि एक्सॉन अशा जागतिक कंपन्यांनी बीपीसीएल विकत घेण्याची तयारी दर्शवली होती.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा