Advertisement

महागाईचा फटका, घरगुती LPG सिलिंडर २५ रुपयांनी महागला

सरकारी तेल कंपन्यांनी १ सप्टेंबर रोजी घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमती वाढवल्या आहेत.

महागाईचा फटका, घरगुती LPG सिलिंडर २५ रुपयांनी महागला
SHARES

सरकारी तेल कंपन्यांनी १ सप्टेंबर रोजी घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमती वाढवल्या आहेत. दिल्लीमध्ये १९ किलो व्यावसायिक गॅसची किंमत १ हजार ६९३ रुपये आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत कोलकातामध्ये १ हजार ७७२ रुपये, मुंबईत १ हजार ६४९ रुपये आणि चेन्नईमध्ये १ हजार ८३१ रुपये प्रति सिलिंडर आहे.

दिल्लीत विनाअनुदानित १४.२ किलो गॅस सिलिंडरच्या किमतीत २५ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. आता दिल्लीत १४.२ किलो एलपीजी सिलिंडर ८८४.५० रुपये झाला आहे. त्याचबरोबर १९ किलो व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीतही ७५ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.

यापूर्वी १७ ऑगस्ट रोजी एलपीजी सिलिंडरच्या किमतीत २५ रुपयांनी वाढ करण्यात आली होती. म्हणजेच १५ दिवसात विनाअनुदानित सिलिंडर ५० रुपयांनी महाग झाले आहे.

या वर्षी १ जानेवारीला दिल्लीत एलपीजी सिलिंडरची किंमत ६९४ रुपये होती. आता सिलिंडरची किंमत ८८४.५ रुपये आहे. म्हणजेच जानेवारीपासून घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत १९०.५० रुपयांची वाढ झाली आहे.

गेल्या ७ वर्षांत घरगुती गॅस सिलिंडर (१४.२ किलो) ची किंमत दुप्पट होऊन ८८४.५० रुपये प्रति सिलिंडर झाली आहे. १ मार्च २०१४ रोजी १४,२ किलो घरगुती गॅस सिलिंडरची किंमत ४१०.५ रुपये होती, जी आता ८८४.५० रुपये आहे.



हेही वाचा

एलपीजी कनेक्शनशी आधार 'असं' करा ऑनलाइन लिंक

बीपीसीएल खरेदी करण्यासाठी परदेशी कंपन्या इच्छुक

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा